Two Al Qaeda terrorists arrested in Lucknow  Twitter @ani
देश

लखनऊमधून अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही पाकिस्तानी हँडलर आहेत( terrorists)

दैनिक गोमन्तक

एटीएसने दोन दहशतवाद्यांना(terrorists) लखनऊमधून ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही पाकिस्तानी हँडलर आहेत. तसेच एटीएस सातत्याने शोध मोहीम राबवित आहे. या व्यतिरिक्त स्थानिक पोलिसही या कारवाईत सामील आहेत. जवळपासची घरे रिकामी केली. बॉम्ब पथकालाही घटनास्थळी बोलावले आहे.

ताब्यात घेतलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची चोकशी सध्या सुरु आहे मात्र हे दोघेही अल कायदाचे असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, घराच्या आतून कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार हे घर ठाकूरगंज भागात असून . हे अतिशय दाट लोकवस्तीचे क्षेत्र आहे.जिथून यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोणत्याही सर्वसामान्यांना इजा होणार नाही याची दक्षता एटीएस घेत आहे. या कारवाईसाठी घटनास्थळी एक रुग्णवाहिकाही बोलविण्यात आली आहे.

यूपीचे माजी डीजीपी विक्रम सिंह यांनी सांगितले की दोन्ही दहशतवाद्यांचे तारे काश्मीरशी संबंधित आहेत. ते म्हणाले की आणखीनही बर्‍याच ठिकाणी कारवाई सुरू आहे.

जिथून आज या दहशतवाद्यांना ताब्यात घेतले ते एक संवेदनशील क्षेत्र आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी याच ठिकाणी सैफुल्लाची चकमकीत घडली होती. 8 मार्च 2017 रोजी ही चकमकी सुमारे 12 तास चालली होती. या कारवाईत संशयित दहशतवादी सैफुल्ला ठार झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

'भारताने गोव्याची केलेली मुक्तता उच्चवर्णीय हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते'; लेखिका अरुंधती रॉय

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

SCROLL FOR NEXT