Omicron Dainik Gomanak
देश

कर्नाटकात आलेल्या 'त्या' दोन आफ्रिकन नागरिकांना 'ओमिक्रॉन' व्हेरिअंटची लागण नाही!

या नव्या 'ओमिक्रॉन' व्हेरिअंटने गेल्या चार दिवसांत 11 देशांमध्ये धुमाखुळ घातला आहे.

दैनिक गोमन्तक

साथिच्या रोगाने जगाला विळखा घातलेला घातलेला असताना गेल्या एक ते दीड वर्षात लाखो लोकांनी आपला जिव गमावला आहे. काही परिवारांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले तर काहींचे कुटुंबच रोगामुळे निस्तनाभुत झाल्याचे आपण पाहिले आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) कोरोनाचा नवा व्हेरिअंट जगासमोर आणला आहे.

दक्षिण आफ्रिकेवरती निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नव्या 'ओमिक्रॉन' (Omicron) व्हेरिअंटने गेल्या चार दिवसांत 11 देशांमध्ये धुमाखुळ घातला आहे. अशावेळी आफ्रिकेहून कर्नाटकमध्ये आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना असल्याचे समोर आल्याने भारतात खळबळ उडाली होती. परंतू, या दोघांनाही ओमीक्रॉन व्हेरिअंटची लागण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दोन्ही आफ्रिकन नागरिकांना दुसऱ्या लाटेतील डेल्टा व्हेरिअंटची लागण झाली आहे. आफ्रिकेतून कर्नाटकाची राजधानी बंगळुरुला आलेले दोन व्यक्ती 11 आणि 20 नोव्हेंबरला कोरोनाबाधित सापडले होते. याच काळात नव्या व्हेरिअंटने आफ्रिकेत हात पाय पसरण्यास सुरुवात केली होती. नव्या व्हेरिअंटच्या केसची घोषणा होताच बंगळुरुच्या आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली होती. या दोघांचे पुन्हा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट आले आहेत.

अधिकाऱ्याने सांगितले की, 1 ते 26 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेतून एकूण 94 लोक भारतात आले आहेत आणि त्यापैकी फक्त दोन लोकांमध्ये कोरोना विषाणूचे पूर्वीचे प्रकार आढळून आले आहेत. या दोघांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर रोजी WHO ने ओमिक्रॉन प्रकार प्रथम शोधला होता.

यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि यूकेमध्येही त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉनच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सर्व परदेशी प्रवाशांसाठी विमानतळावर स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. यासोबतच केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठीही आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT