Twitter Blue Tick: Dainik Gomantak
देश

Twitter Removes Legacy Blue Checkmarks: ट्विटरने ब्लू टिक हटवली! बॉलीवूड स्टार्स, क्रिकेटर्ससह 'या' राजकीय नेत्यांचाही यादीत समावेश

विराट कोहली ते सलमान खान सारख्या अनेक बड्या व्यक्तींच्या अकाउंटवरुन ब्लू टिक्स काढण्यात आले आहे

Puja Bonkile

Twitter Removes Legacy Blue Checkmarks: ट्विटरने व्हेरिफाईड अकाऊंट म्हणून सुरू केलेली ब्ल्युटीक सेवा मध्यरात्रीपासून बंद केली आहे. आता या सेवेसाठी युजर्संना पैसे मोजावे लागणार आहे.

वैयक्तिक खात्यावर ब्लू टिकचा कालावधी हा 20 एप्रिलपर्यंत होता. आज मध्यरात्री पासून अनेक व्हेरिफाईड यूझरच्या ब्ल्यु टीक या आता बंद झाल्या आहेत.

भारतीय क्रिकेटर विराट कोहली ते बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानसह अनेक बड्या व्यक्तींच्या व्हेरीफाईड ट्विटर अकाऊंटच्या ब्लू टिक्स काढून टाकण्यात आल्या आहेत.

यापुढे जर एखाद्याला ब्लू टिक व्हेरिफिकेशन हवे असेल तर ट्विटरसाठी पैसे द्यावे लागतील. आता ब्लू टिक्स फक्त त्या ट्विटर अकाऊंटवर दिसतील. ज्यांनी ट्विटरवरून हे बटन सबस्क्राइब केले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक प्रमुख नागरिकांच्या आणि सेलीब्रेटिंच्या ट्विटर हँडलवरून ब्लू टिक्स काढून टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये क्रिकेटर्सपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.

इलन मस्कच्या ट्विटरने ब्लुटीक बाबत धोरण या पूर्वीच जाहीर केले होते. ज्यांचे खाते व्हेरिफाईड आहेत आता त्यांना या पुढे ब्ल्यु टीक साठी पैसे मोजावे लागणार आहे. ज्यांनी २० एप्रिल आधी या सेवेसाठी पैसे मोजले आहेत, त्यांनाच हे ब्ल्यु टीक देण्यात आले आहेत.

  • ब्लू चेक मार्क आधी 1 एप्रिलला काढला जाणार होता,

ट्विटरने 31 मार्चला जाहीर केले होते की येत्या काही दिवसांत त्यांची कंपनी लेगसी व्हेरिफाईड अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकेल, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तो ब्लू टिक काढू शकला नाही, पण नंतर मस्कने आपल्या एका ट्विटमध्ये 20 एप्रिलपासून लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटसमोरील निळा चेक मार्क ट्विटरवरून हटवला जाईल, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT