Trump Tariffs India Dainik Gomantak
देश

Trump Tariffs India: ट्रम्प यांचा पुन्हा भारताला धक्का, आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची केली घोषणा

Donald Trump: रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्याचे कारण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर आणखी २५ टक्के एवढे आयातशुल्क लावण्याची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्याचे कारण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर आणखी २५ टक्के एवढे आयातशुल्क लावण्याची घोषणा केली आहे. भारताला दंड म्हणून ट्रम्प यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली.

अध्यक्ष ट्रम्प यांनी यासंबंधीच्या कार्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. आता या ताज्या आदेशानंतर भारतावरील आयातशुल्काचे प्रमाण हे पन्नास टक्क्यांवर पोहोचले आहे.

ट्रम्प यांनी याआधी जाहीर करण्यात आलेले आयातशुल्क हे उद्यापासून (ता.७) लागू होणार असून त्यात जी आणखी वाढ करण्यात आली आहे ती २७ ऑगस्टनंतर लागू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काही खास वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या निर्यातीला या आयातशुल्कातून सवलत मिळू शकते असेही बोलले जाते. जी वस्तू आणि उत्पादने अद्याप अमेरिकेत पोचलेली नाहीत पण ती अर्ध्या रस्त्यामध्ये आहेत त्यांना सूट दिली जाऊ शकते. जी उत्पादने आधीच अमेरिकेमध्ये पोचली आहेत त्यांनाही सूट मिळू शकते.

मोदी जाणार चीन दौऱ्यावर?

अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापारी करारावरून सुरू असलेली बोलणी अद्याप निर्णायक पातळीवर पोचली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यामध्ये चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीमध्येही ते सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. जपान भेटीने (२९ ऑगस्ट) या दौऱ्याला सुरुवात होणार अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT