Crime News  Dainik Gomantak
देश

Tripura: एका बॅगमध्ये शीर, दुसऱ्यामध्ये सापडलं धड; अल्पवयीन पत्नीची निर्घृण हत्या!

Tripura Crime: त्रिपुरातील आगरतळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Tripura Crime: त्रिपुरातील आगरतळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपीच्या सांगण्यावरुन पोलिसांनी मृतदेहाचे तुकडेही जप्त केले आहेत.

काय आहे प्रकरण

15 वर्षीय तनुजा बेगम असे मृत महिलेचे नाव आहे. तनुजाचा आठ महिन्यांपूर्वी कायेम मियाँसोबत विवाह झाला होता. तनुजाचा धाकटा भाऊ बपन मियाँने सांगितले की, तनुजा गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता होती. जेव्हा तनुजाची आई आपल्या मुलीशी बोलली नाही तेव्हा ती आगरतळा येथील मुस्लिमपारा भागात तिच्या सासरी पोहोचली, जिथे तनुजा आपल्या पतीसोबत राहत होती. मात्र, तिथे कोणीही नव्हते.

रिपोर्ट्सनुसार, तनुजाच्या आईला घरात रक्ताचे डाग दिसल्यावर ती रडू लागली. यानंतर तिच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिथे आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कायेम मियाँचा शोध सुरु केला आणि अनेक तास शोध घेतल्यानंतर त्याला पकडले.

दुसरीकडे, चौकशीदरम्यान कायेम मियाँ याने पत्नी तनुजाच्या हत्येची कबुली दिली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करुन दोन पिशव्यांमध्ये भरुन जंगलात फेकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरुन दोन्ही पिशव्या जप्त केल्या असून पिशव्यांमधून तनुजाच्या मृतदेहाचे तुकडेही जप्त करण्यात आले आहेत. तनुजाचे शीर एका पिशवीत सापडले, तर उर्वरित धड दुसऱ्या बॅगमधून सापडले. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे. हत्येमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. या हत्येमध्ये तिसर्‍या व्यक्तीचाही हात आहे का, याचाही शोध घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election: गोव्यात विरोधकांच्या आघाडीची जोरदार तयारी! काँग्रेसची 'आरजी', 'आप'सोबत दोन दिवसांत चर्चा; गोवा फॉरवर्डशीही बोलणी करण्याचे चोडणकरांचे संकेत

Viral Post: 379 रुपयांचं जेवण मागवलं अन् 1,166 रुपयांचं बिल आलं! डिलिव्हरी चार्ज पाहून ग्राहक हैराण, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Goa Politics: काँग्रेसचे 'तिकीट' विक्रीसाठी? नुवेच्या उमेदवारीवरून भाजपचा थेट सवाल; कार्यालयाच्या जागेच्या व्यवहाराबाबत मागितला खुलासा

September 1 Rule Change: 1 सप्टेंबरपासून देशात 7 मोठे बदल! एलपीजी, विमान प्रवास, बँक एफडी आणि कार खरेदीवर होणार थेट परिणाम

Goa Assembly Election: 'मगो'च्या सर्वेक्षणावर भाजपचे मौन! फोंड्यानंतर साखळीसह 12 मतदारसंघांवर दावा

SCROLL FOR NEXT