Kashi Uttar Pradesh Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणतात.... 'लोक गोवा ऐवजी काशीला देताहेत पसंती'

गंगेच्या काठावर अमृत कलशावर स्थापित नटराजाच्या 25 फूट उंच मूर्तीचे अनावरण

Pramod Yadav

Kashi Uttar Pradesh: "काशी पूर्वीपेक्षा खूप बदलली आहे. येथे रस्ते, पथदिवे, उद्याने, स्टेडियमसह अनेक कामे केली जात आहेत. हे सर्व गंगा मातेच्या कृपेने घडत आहे. लोक गोवा ऐवजी काशीला येण्यास प्राधान्य देत आहेत," असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी केले. केदारघाट येथील भूम अध्यात्म पीठम येथे शुक्रवारी (दि.08) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. दयाशंकर मिश्रा 'दयाळू आणि रवींद्र जैस्वाल, महापौर अशोक तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भूमानंद तीर्थाच्या 31 व्या निर्वाण दिन उत्सवाच्या निमित्ताने ब्रजेश पाठक यांच्या हस्ते गंगेच्या काठावर अमृत कलशावर स्थापित नटराजाच्या 25 फूट उंच मूर्तीचे अनावरण केले. उपमुख्यमंत्र्यांनी बाबा विश्वनाथ यांच्या चरणी काशीत येणाऱ्या लोकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सर्व दुःख दूर करण्याची प्रार्थना केली.

'जगाच्या कल्याणासाठी आणि सनातन धर्माच्या उद्धारासाठी भगवान नटराजाने प्रथम 14 वेळा डमरू वाजवला. सन 2024 मध्ये सनातन धर्माचे रक्षण करणारे सरकार स्थापन व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे,' असे मठाचे प्रभारी सर्वेश्वर ब्रह्मचारी म्हणाले.

भागवत कथेच्या चौथ्या दिवशी डॉ.श्याम सुंदर पाराशर यांनी हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांचा प्रसंग सांगितला. श्रीमद भागवत कथेचा आस्वाद घेणे ही भाग्याची गोष्ट आहे. सांसारिक जीवनात काय बरोबर आणि काय अयोग्य हे कथा सांगते, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: प्रामाणिक सोनारामुळे महिलेला मिळाले हरवलेले मंगळसूत्र, व्हॉट्‌सॲप ग्रुप ठरला फायद्याचा

Goa News Live Update: आग्वाद येथे दोघांवर चाकू आणि कात्रीने हल्ला; तामिळनाडूच्या पाच जणांना अटक

Horoscope: शनिदेवाची कृपा आज 'या' 4 राशींवर; धन, धान्य आणि समाधान लाभेल

Mohammed Siraj Record: सिराजने मोडला बुमराहचा विक्रम! 29 वर्षांनंतर 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू

Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोमागे स्वार्थ?

SCROLL FOR NEXT