Most Runs In Test Cricket Dainik Gomantak
देश

Most Runs In Test Cricket: क्रिकेटच्या कसोटीत 'या' 5 खेळाडूंनी गाजवलंय मैदान; एका डावात ठोकल्या विक्रमी धावा, पहिल्या क्रमांकावर कोण?

Most Runs In One Test Innings: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुलावायो येथे खेळला जात आहे.

Sameer Amunekar

Most Runs In One Test Cricket Innings

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुलावायो येथे खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्थायी कर्णधार वियान मुल्डरने फलंदाजीने शानदार कामगिरी केली आणि त्रिशतक झळकावले.

कसोटी डावात सर्वाधिक धावा करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची त्याच्याकडे संधी होती, परंतु तो तसे करू शकला नाही. या डावात ३६७ धावा करून मुल्डर नाबाद परतला. यादरम्यान त्याने ४९ चौकार आणि ४ षटकार मारले. यासह, तो कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत टॉप-५ मध्ये पोहोचला आहे.

ब्रायन लारा

कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावर आहे. २००४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ४०० धावा केल्या. ७७८ चेंडूंच्या या डावात त्याने ४३ चौकार आणि ४ षटकार मारले. लाराचा हा विक्रम आतापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील हा सामना अनिर्णित राहिला.

मॅथ्यू हेडन

मॅथ्यू हेडनचे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नाव आहे. २००३ मध्ये पर्थ येथे झिम्बाब्वेविरुद्ध हेडनने ६२२ चेंडूत ३८० धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ३८ चौकार आणि ११ षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ८६.९५ होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव आणि १७५ धावांनी जिंकला.

ब्रायन लारा

या यादीत ब्रायन लाराचे नाव पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात लाराने ७६६ चेंडूत ३७५ धावा केल्या. त्याने त्याच्या डावात ४५ चौकार मारले. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना अनिर्णित राहिला.

महेला जयवर्धने

या यादीत श्रीलंकेचा महेला जयवर्धने चौथ्या क्रमांकावर आहे. २००६ मध्ये कोलंबो येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ७५२ चेंडूत ३७४ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४३ चौकार आणि एक षटकार मारला. श्रीलंकेने तो सामना एक डाव आणि १५३ धावांनी जिंकला.

विआन मुल्डर

दक्षिण आफ्रिकेचा विआन मुल्डर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्ध ३३४ चेंडूत ३६७ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४९ चौकार आणि ४ षटकार मारले. लाराला मागे टाकण्याची त्याच्याकडे संधी होती पण तो असे करण्यात यशस्वी होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची जागतिक पातळीवर छाप; ठरले आशिया पॅसिफिकमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व

Goa Kidnapping Case: बेपत्ता शाळकरी मुलांची महाराष्ट्रातून सुटका, उत्तर प्रदेशातील एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई

Goa Land Conversions: गोमंतकीयांशी चाललेली प्रतारणा थांबवा, थोडी तरी जमीन गोवेकरांसाठी ठेवा..

IND vs ENG 3rd Test: गिलसाठी 'लॉर्ड्स टेस्ट' बनणार अग्निपरीक्षा, क्रिकेटच्या पंढरीत कसा आहे भारताचा रेकॉर्ड? आकडे भरवतात धडकी

Murder Case Goa: गुप्तांग कापले, डोके ठेचले! पर्रा येथे कामगाराचा कोल्ड बल्डेड खून; बाप लेकाला अटक

SCROLL FOR NEXT