Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

'हा नवा भारत', रॅंक नाही तर पदकं मिळवून कमावतोय नाव: नरेंद्र मोदी

दैनिक गोमन्तक

टोकियोमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धांमध्ये सध्या भारतीय खेळांडूंची कामगीरीवर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटताना दिसता आहेत. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खेळांडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन भारत रँक द्वारे नव्हे तर पदके जिंकून जागतिक स्तरावर आपले नाव मोठे करत आहे. तसेच हे सिद्ध झाले आहे की एखाद्याची प्रगती कुटुंबाने नव्हे तर कठोर परिश्रमाने ठरवली जाते. भारतीय तरुण पुढे जात आहेत, प्रगती करता आहेत अशा भावना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हॉकीसह इतर सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना व्यक्त केल्या आहेत.

टोकियोमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने बॅडमिंटन, वेट लिफ्टींग, पुरुष हॉक, बॉक्सिंग आदी स्पर्धांमध्ये आतापर्यंत वेगवेळ्या पदकांवर भारताने नाव कोरले आहे. भारताने पर्यंत एकुण 8 पदकं मिळवली असली, तरी इतर देशांच्या तुलनेत भारत 66 व्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकमध्ये सध्या पहील्या स्थानावर चीन, दुसऱ्या स्थानावर अमेरीका आणि तिसऱ्या स्थानावर जपान हे राष्ट्र आहेत.

यंदाच्या आलिम्पिकमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा म्हणजे 126 खेळाडू सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे हॉकीमध्ये 41 वर्षांनंतर पदक मिळाले आहे. याच सर्व कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला (Independence day) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक (Olympics) तुकडीला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध 2-5 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT