भारतीय महिला हॉकी संघाने(Women's Hockey Team) टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics ) मध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश(Hockey Final) केला आहे. भारतीय महिला हॉकी संघाच्या इतिहासातील आजचा दिवस सुवर्णच म्हणावा लागेल कारण आज पहिल्यांदाच हिला हॉकी संघ सेमी फायनल खेळत आहे. एकीकडे पुरुष संघाचे उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभव झाल्यानंतर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे, तर दुसरीकडे महिला संघ अजूनही सुवर्णपदक जिंकण्याच्या शर्यतीत आहे.(Salima Tete's village in Jharkhand doesnt has electricity to watch her game)
असे अनेक भावनीक पैलू आजच्या सामन्याला आहेत.
भारतीय महिला संघातील अनेक खेळाडू छोट्या शहरातून येतात आणि त्यांना आपले करिअर घडवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अशाच एका संघर्षाची कथा आहे - सलीमा टेटे (Salima Tete).
सलीमा टेटे झारखंडच्या बरकीचापार येथून येते. या गावात 50 पेक्षा कमी कुटुंबे आहेत. त्यांच्याकडे टीव्ही,वीज नाही. इंटरनेट आहे. पण ते वेगाने जात नाही. आता याच परिस्थितीत सलीमाच्या घरचे तरी कसे आपल्या लेकीला हा ऐतिहासिक समना खेळताना पाहतील ?
भारताच्या क्वार्टर फायनल सामन्याच्या दिवशी,तिचे कुटुंब आपली मुलगी खेळताना पाहू शकले नव्हते , ज्याचे कारण खराब टीव्ही आणि त्यांच्या घरात वीज नव्हती. यानंतर, सोशल मीडियावर इनसाइडस्पोर्टद्वारे यासंदर्भात एक मोहीम चालवली गेली. त्याचा परिणाम असा झाला की जिल्हा प्रशासनाकडून सलीमा टेटे यांच्या घरी नवीन टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.
सलीमा टेटे यांच्या घरी टीव्ही होता पण वीज नसल्याने कुटुंबातील सदस्य सामना पाहू शकले नाहीत. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी जनरेटरसह सेमीफाईल सामने पाहण्याची योग्य व्यवस्था केली. यासोबतच जुना टीव्ही बदलून सलीमा टेटे यांच्या घरी नवीन 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स बसवण्यात आला आहे जेणेकरून तिचे कुटुंबीय आणि गावातील लोक बुधवारी उपांत्य फेरीचा सामना पाहू शकतील.असे हॉकी सिमडेगाचे अध्यक्ष मनोज कोनबेगी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.