Mahua Moitra and Leena Manimekalai Dainik Gomantak
देश

'माझ्यासाठी माॅं काली ही मांसाहार करणारी, मद्य पिणारी देवी...': महुआ मोइत्रा

दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरवरून वादाला तोंड फुटले आहे.

दैनिक गोमन्तक

दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या 'काली' (Kaali) या माहितीपटाच्या पोस्टरवरून वादाला तोंड फुटले आहे. पोस्टरमध्ये एक अभिनेत्री माँ काली अवतारात सिगारेट ओढताना आणि दुसऱ्या हातात त्रिशूल धरताना दाखवण्यात आली आहे, त्यामुळे लीनावर सर्वत्र टीका होत आहे. राजकारण्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील लोक या प्रकरणावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

त्याचवेळी, आता अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांचे 'काली' या माहितीपटाच्या आक्षेपार्ह पोस्टरवरून वक्तव्य समोर आले आहे. खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या, "माझ्यासाठी मा काली ही मांसाहार करणारी, मद्य पिणारी देवी आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या देवीची कल्पना करण्याचे स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी देवतांना व्हिस्की अर्पण केली जाते, तर काही ठिकाणी निंदा केली जाते."

हिंदू देव-देवतांचे अपमानास्पद चित्रण

'काली' या माहितीपटाच्या पोस्टरमुळे देशभरात खळबळ उडाली असताना दोन ठिकाणी लीना यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर लोक निर्मात्यांना अटक करण्याची मागणी करत आहेत. त्याचवेळी दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. यूपी पोलिसांनी 'काली' चित्रपटाची निर्माती लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात हिंदू देव-देवतांचे अपमानास्पद चित्रण केल्याबद्दल, गुन्हेगारी कट, पूजास्थळी गुन्हेगारी, हेतुपुरस्सर शांतता भंग केल्याच्या दुखावण्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. त्याच वेळी, दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने काली चित्रपटाशी संबंधित एका वादग्रस्त पोस्टरच्या संदर्भात आयपीसीच्या कलम 153A आणि 295A अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

निर्मात्यांचे स्पष्टीकरण

लीना यांनी ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, "माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मला निर्भयपणे बोलणारा आवाज बनायचे आहे. जर त्यासाठी माझ्या जीवाची किंमत मोजावी लागली तर मी ती मोजायला तयार आहे." जेव्हा वाद आणखी तिव्र वाढू लागला तेव्हा लीनाने तमिळमध्ये एक पोस्ट शेअर केली. "या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की एका संध्याकाळी काली टोरंटोच्या रस्त्यावर फिरतांना दिसते . तुम्ही हा चित्रपट पाहिला तर तुम्ही मला अटक करण्याच्या मागणीऐवजी, माझ्यावर प्रेम करायला लागणार," असे ट्विट लीना यांनी तमिळमध्ये केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT