Owaisi on Inflation: एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारवर टीका करताना ओवेसी म्हणाले की, 'देशातील महागाई आणि बेरोजगारीला मुघल नव्हे तर मोदी जबाबदार आहे.'(Asaduddin Owaisi Taunt On The Central Government On Rising Inflation)
दरम्यान, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष ओवेसी यांनी अनेक मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला. याच क्रमाने त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ते एका जाहीर सभेला संबोधित करताना दिसत आहेत. त्या व्हिडिओमध्ये ओवेसींनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "भारतात बेरोजगारी मोठ्याप्रमाणात वाढत आहे. महागाई गगनाला भिडत आहे. डिझेलने शंभरी पार केली आहे. यास औरंगजेब नव्हे तर पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत.''
ते पुढे म्हणाले की, ''देशातील वाढत्या महागाईला केवळ नि केवळ मोदी सरकारच जबाबदार आहे. पेट्रोल 104 रुपये लिटर मिळत असेल तर त्याला ताजमहाल (Taj Mahal) जबाबदार आहे. ताजमहाल नसता तर आज पेट्रोलचे दर 40 रुपये झाले असते. ताजमहाल, लाल किल्ला बनवून मुघलांनी चूक केली, असे मी मानतो.''
ओवेसी केंद्रावर सवाल करताना म्हणाले...
व्हिडिओमध्ये ओवेसी केंद्राला प्रश्न विचारताना दिसत आहेत. ओवेसी म्हणाले, ''भारतात (India) फक्त मुघलांचे सरकार होते का? मुघलांपूर्वी अशोक, चंद्रगुप्त यांनीही देशावर राज्य केले, परंतु भाजप प्रत्येक गोष्टीसाठी मुघलांना जबाबदार धरत आहे. त्यांना फक्त मुघल दिसतायेत.'' ओवेसी पुढे म्हणाले की, ''भाजपला एका नजरेतून मुघल आणि दुसऱ्या नजरेतून पाकिस्तान दिसतो. पण आमचा मुघलांशी किंवा पाकिस्तानशी काही संबंध नाही. देशातील वाढत्या महागाई आणि बेरोजगारीबद्दल मोदी सरकारला काय म्हणायचे आहे''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.