TMC Expelled Sheikh Shahjahan Dainik Gomantak
देश

TMC Expelled Sheikh Shahjahan: हायकोर्टानंतर शाहजहान शेखला TMC कडून मोठा झटका; पक्षातून केली हकालपट्टी

TMC Expelled Sheikh Shahjahan: शाहजहान शेख यांना आता तृणमूल काँग्रेसकडून (टीएमसी) मोठा झटका बसला आहे. टीएमसीने शाहजहान यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

Manish Jadhav

TMC Expelled Sheikh Shahjahan: संदेशखळी प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारबाबत कठोरता दाखवत टीएमसीचे दबंग नेते शाहजहान शेख यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे म्हटले होते. यातच आता, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील टीएमसी नेते शाहजहान शेख यांना पोलिसांनी अटक केली. शाहजहान यांना अटक करण्यासाठी बंगाल पोलिसांना तब्बल 55 दिवस लागले. दरम्यान, शाहजहान शेख यांना आता तृणमूल काँग्रेसकडून (टीएमसी) मोठा झटका बसला आहे. टीएमसीने शाहजहान यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

डेरेक ओ'ब्रायन यांनी पुष्टी केली

टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसने पक्षाचे नेते शाहजहान शेख यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहजहान यांच्यावर संदेशखळी येथील लोकांच्या जमिनी हडप केल्याचा आणि महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. दरम्यान, शाहजहान यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला तेव्हा त्यांच्या समर्थकांच्या जमावाने अधिकाऱ्यांच्या टीमवर हल्ला केला होता.

55 दिवसांपासून फरार होते

दुसरीकडे, संदेशखळीतही हिंसक निदर्शने पाहायला मिळाली. शाहजहान हे 5 जानेवारीपासून फरार होते. शाहजहान गेल्या 55 ​​दिवसांपासून फरार होते. मात्र, पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांना आज सकाळी अटक केली. यानंतर स्थानिक न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

जामीनाच्या मागणीवरुन उच्च न्यायालयाने खडसावले

यापूर्वी, उच्च न्यायालयाने शाहजहान यांना जामीन देण्यास नकार देत दणका दिला होता. शाहजहान यांच्या जामिनाची मागणी करत कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचलेल्या वकिलाला गुरुवारी मुख्य न्यायाधीशांनी चांगलेच फटकारले. त्यांना कोठडीतच राहू द्या, असे उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. आरोपींबद्दल आम्हाला सहानुभूती नाही, असेही न्यायालयाने पुढे म्हटले. दुसरीकडे, ईडीनेही उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. ईडीने सांगितले की, शाहजहान पोलिस कोठडीत असल्याने रेशन भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते. रेशन वितरण प्रकरणात सुमारे 10 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ईडीचा दावा आहे.

सीआयडी अधिकारी चौकशी करणार आहेत

आता सीआयडीचे अधिकारी शाहजहान यांची चौकशी करणार आहेत. त्यांना 10 दिवस भवानी भवन येथे कोठडीत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, शाहजहान यांना टीएमसीने निलंबित केले. संदेशखळी प्रकरणी विरोधकांनी ममता सरकारचा चांगलाच समाचार घेतला. दुसरीकडे, असे बोलले जात आहे की लवकरच पीएम मोदी संदेशखळीलाही भेट देऊ शकतात. महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदी बंगालला भेट देणार आहेत. यादरम्यान ते संदेशखळी येथील पीडित महिलांनाही भेट देतील. दरम्यान, शाहजहान यांना अटक झाल्यावर महिलांनी जल्लोष केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT