देश

Time of Day (ToD): ग्राहकांची सुटका की फटका? आता दिवस अन् रात्रीसाठी आकारले जाणार, वेगवेगळे वीज बिल; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Electricity Rules : सरकार टाइम ऑफ डे (TOD) दर प्रणाली लागू करणार आहे. त्यामुळे दिवसा व रात्री वेगवेगळी वीज बिले आकारली जाणार आहेत.

Ashutosh Masgaunde

Central Government amends Electricity (Rights of Consumers) Rules:

केंद्र सरकार आता देशातील वीज बिल निश्चित करण्यासाठी नवा नियम लागू करणार आहे. यानंतर, ग्राहक दिवसा वीज बिलात 20% पर्यंत बचत करू शकतात.

मात्र रात्रीच्या वेळी ग्राहकांना 10 ते 20 टक्के जास्त वीज बिल भरावे लागू शकते. यासाठी, वीज (ग्राहकांचे हक्क) नियम, 2020 मध्ये आवश्यक सुधारणा करून टाइम ऑफ डे (TOD) दर प्रणाली लागू केली जाईल.

TOD ही ग्राहकांसाठी लाभदायक प्रणाली आहे. यामध्ये पीक अवर्स, सोलर तास आणि सामान्य तासांसाठी वेगवेगळे दर समाविष्ट आहेत. जागरूकता आणि TOD दराच्या प्रभावी वापराने, ग्राहक त्यांचे वीज बिल कमी करू शकतात.
आर.के. सिंह,  केंद्रीय ऊर्जा मंत्री

वीज बिल रात्री जास्त आणि दिवसा कमी

दिवसभरात एकाच दराने वीजबिल भरण्याऐवजी ग्राहक दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी विजेचे वेगवेगळे शुल्क भरतील. अशात प्रकारे, ते त्यांच्या विजेच्या वापराचे व्यवस्थापन करून सहजपणे वीज बिल वाचवू शकतील.

 टीओडी प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे, ग्राहक विज वापराच्या सर्वाधिक वेळेत कपडे धुणे आणि स्वयंपाक करणे यासारखी जास्त वीज वापरणारी कामे करण्यापासून परावृत्त होऊ शकतील.

त्यामुळे त्यांना वीज बिलात बचत करता येणार आहे. मात्र रात्रीच्या वेळी एसी किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तू वापरल्यास जास्त वीज बिल भरावे लागणार आहे.

सौर तास किती असतील?

दिवसा वीज बिल कमी होईल कारण दिवसा सौर उर्जेवर वीज पुरवठा केला जाईल. सरकारचे म्हणणे आहे की, या पावलामुळे कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांपासून बनवलेल्या विजेची मागणी कमी होईल.

सौर तास (दिवसाचे 8 तास) वीज वापर व्यवस्थािपन करून ग्राहक बिलांमध्ये 20% पर्यंत बचत करू शकतात. मात्र रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरल्यास सामान्यपेक्षा जास्त वीज मोजावी लागेल. कारण पीक अवर्समध्ये टॅरिफ 10-20 टक्के जास्त असेल.

ही प्रणाली कधी लागू होणार?

अधिकृत माहितीनुसार, TOD दर 1 एप्रिल 2024 पासून 10 kW आणि त्याहून अधिक मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी लागू होईल.

यानंतर, 1 एप्रिल 2025 पासून, कृषी ग्राहक वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी TOD प्रणाली लागू केली जाईल. स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांसाठी ही प्रणाली तेव्हाच लागू होईल जेव्हा त्यांना असे मीटर बसवले जातील.

स्वतंत्र वीज शुल्क

दिवसभरात एकाच दराने वीजबिल भरण्याऐवजी ग्राहक दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी विजेचे वेगवेगळे शुल्क भरतील. अशा प्रकारे ते त्यांच्या विजेच्या वापराचे व्यवस्थापन करू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT