JNU Delhi Campus
JNU Delhi Campus Dainik Gomantak
देश

JNU Campus मध्ये थरारनाट्य! कारमधून प्रवेश, विद्यार्थिनींचा विनयभंग आणि नंतर अपहरणाचा प्रयत्न...

Ashutosh Masgaunde

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात काही मद्यधुंद लोकांनी एक-दोन विद्यार्थिनींचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (जेएनयूएसयू) च्या सदस्यांनी आरोप केला की मद्यधुंद टोळक्याने मंगळवारी कारमधून कॅम्पसमध्ये प्रवेश केला आणि दोन विद्यार्थिनींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग आणि अपहरण असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. दक्षिण-पश्चिम दिल्ली पोलिसांचे डीसीपी मनोज सी म्हणाले, 'जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, एक मारहाण आणि दुसरी विनयभंग आणि अपहरणाच्या प्रयत्नाशी संबंधित आहे. दोन्ही घटनांमध्ये आरोपी आणि घटनेत वापरलेले वाहन एकच आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.'

पोलीस हल्लेखोरांच्या शोधात

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे, ज्याचे नाव अभिषेक असे आहे. आपण विद्यापीठाचा विद्यार्थी नसल्याचे त्याने सांगितले.

जेएनयूमध्ये अशा घटना वारंवार

जेएनयूएसयूने म्हटले आहे की, 'कुलगुरूंनीही या घटनेबाबत पोलीस तक्रार दाखल करावी. कुलगुरूंनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांशी कॅम्पसमध्ये वारंवार होत असलेल्या गैरवर्तुनुकिबाबत बोलले पाहिजे. हल्ला झालेल्या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिने तक्रार दाखल केली आहे.

JNU प्रशासनाची प्रतिक्रिया

जेएनयू प्रशासनाने कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना या घटनेबाबत काही माहिती असल्यास त्वरित सुरक्षा शाखा किंवा पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. विद्यापीठ कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारासाठी झीरो टॉलरेन्स धोरण अवलंबते आणि सर्वांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी वचनबद्ध आहे.

कॅम्पसमध्ये विद्यार्थीनी सुरक्षित आणि निर्भयपणे येऊ शकतील याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही लैंगिक छळाशी संबंधित कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीसाठी वचनबद्ध आहोत.

रात्री १० पासून वाहनांना प्रवेश बंदी

या घटनेच्या काही तासांनंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कॅम्पसमध्ये बाहेरील वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे. एबीव्हीपीच्या जेएनयू युनिटने या घटनेचा निषेध केला आणि पीडितांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. संघटनेने मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याच्या राजीनाम्याची मागणी केली.

काय होती विद्यार्थी संघटनांची मागणी?

एबीव्हीपी-जेएनयूने म्हटले की, 'आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि पीडितांच्या पाठीशी उभे आहोत. दिल्लीतील जेएनयू कॅम्पस हे शहरातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक आहे. मात्र, अलीकडच्या काही घटनांमुळे त्याच्या सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही अक्षम CSO च्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT