Railways Dainik Goamantak
देश

दक्षिण रेल्वेच्या तीन गाड्या रद्द; 4 गाड्यांच्या मार्गात बदल

काल ही दरड कोसळून रेल्वे (Railway) मार्गावर माती आली होती. या दरडी बरोबर संरक्षक भिंतही कोसळली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: केरळ (Kerala) येथील पालघट येथील पडिल कुलसेकरा (Padil Kulasekara) येथे रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड अजून काढली न गेल्याने दुसऱ्या दिवशीही दक्षिण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे तीन गाड्या रद्द करण्यात आल्या तर चार गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. काल ही दरड कोसळून रेल मार्गावर माती आली होती. या दरडी बरोबर संरक्षक भिंतही कोसळली. हा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न जरी सुरू केले असले तरी कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामात व्यत्यय येत होता.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार यामुळे आजची 17 तारखेची बंगळुरू- कारवार स्पेशल, 18 तारखेच्या कोचुवेली- एलटीटी गरीबरथ आणि थिरुवनंतपुरम- एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या. काल थिरुवनंतपुरम येथून सुटलेली निझमुद्दीन एक्सप्रेस एरोडमार्गे कल्याण, नेत्रावती एक्सप्रेस पडील मार्गे लोंढा मडगाव, जबलपूर - कोईमतूर एक्सप्रेस पनवेल, हुबळी एरोड मार्गे तर निझमुद्दीनहुन काल थिरुवानंतपुरम येथे जाण्यास सुटलेली गाडी पनवेल हुबळी एरोडमार्गे वळविण्यात आली आहे. उद्या 18 रोजी कोचुवेली येथून पोरबंदर येथें जाण्यास सुटणारी साप्ताहिक एक्सप्रेस सकाळी 9.15 वाजता सुटण्याऐवजी रात्री 7.15 वाजता म्हणजेच 10 तास उशिरा सोडण्यात येणार असल्याचे कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

SCROLL FOR NEXT