Ghulam Nabi Azad Dainik Gomantak
देश

Congress मध्ये फुटले राजीनाम्याचे पेव, आझादनंतर आणखी तीन नेत्यांनी दिला राजीनामा

Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात राजीनाम्याचे पेव फुटले आहे.

दैनिक गोमन्तक

Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात राजीनाम्याचे पेव फुटले आहे. सोमवारी आणखी तीन काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला आहे. माजी उपसभापती गुलाम हैदर मलिक यांच्यासह आणखी तीन काँग्रेस नेत्यांनी सोमवारी आझाद यांच्या समर्थनार्थ पक्षाचा राजीनामा जाहीर केला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री 73 वर्षीय आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेससोबतचा पाच दशकांचा संबंध संपवला.

दरम्यान, आझाद यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. अंतर्गत निवडणुकीच्या नावाखाली काँग्रेस नेतृत्व फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर ‘अपरिपक्व आणि बालिश’ वर्तनाचा आरोपही केला. कठुआच्या बानी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार मलिक आणि दोन माजी आमदारांनी (Subhash Gupta of Kathua and Sham Lal Bhagat of Doda) यांनी स्वतंत्रपणे पक्षाच्या उच्चाधिकार्‍यांना राजीनामे पाठवले आहेत.

दुसरीकडे, आझाद यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री जीएम सरोरी म्हणाले, "आम्हाला मलिक, गुप्ता आणि भगत यांच्याकडून समर्थनाची पत्रे मिळाली आहेत." माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री अब्दुल मजीद वाणी, मनोहर लाल शर्मा आणि घारु राम आणि माजी आमदार बलवान सिंग यांनीही आझाद यांची दिल्लीत भेट घेतली. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी त्यांनी आझाद यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे जाहीर केले, अशी माहिती एका सूत्राने दिली.

याशिवाय, काँग्रेसच्या जम्मू आणि काश्मीर (Jammu And Kashmir) युनिटला रविवारी आणखी एक धक्का बसला, जेव्हा काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री ताज मोहिउद्दीन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील झाले. मोहिउद्दीन यांनी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटाने नॅशनल कॉन्फरन्स किंवा पीडीपीशी युती करणार असल्याचे स्पष्ट केले.

मोहिउद्दीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आज मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह माझ्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे." आझाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच तीन माजी मंत्र्यांसह पक्षाच्या आठ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते लवकरच नवीन पक्ष स्थापन करु शकतात, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. आझाद यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणखी नेते राजीनामे देण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, 'आझाद यांच्या समर्थनार्थ माजी मंत्री आर. एस. चिब, जी. एम. सरोरी आणि अब्दुल रशीद, माजी आमदार मोहम्मद अमीन भट, गुलजार अहमद वाणी आणि चौधरी मोहम्मद अक्रम, माजी आमदार नरेश गुप्ता आणि पक्षाचे नेते सलमान निजामी यांनी राजीनामा दिला.'

त्याशिवाय, माजी मंत्री आणि आमदारांसह डझनहून अधिक प्रमुख काँग्रेस नेते, शेकडो पंचायती राज संस्था (PRI) सदस्य, महापालिका आणि जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील नेत्यांनी आझाद गटामध्ये सामील होण्यासाठी आधीच काँग्रेस सोडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT