पंजाबमधील विधानसभा निवडणुकीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसमधील (Congress) आणखी तीन नेत्यांनी आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश केला आहे. आपमध्ये सामील झालेल्या नेत्यांमध्ये मनदीप आहुजा, प्रियंका शर्मा आणि गुरजीत कौर (Gurjeet Kaur) यांचा समावेश आहे. काल अमृतसरचे महापौर करमजीत सिंह रिंटू यांनीही आम आदमी पार्टीचे सदस्यत्व घेतले होते. (Three More Congress leaders Have Joined The Aam Aadmi Party Ahead Of The Punjab Elections)
दरम्यान, पंजाब निवडणुकीबाबत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काँग्रेसला घेरले आहे. केजरीवालांनी नुकतेच काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, 'काँग्रेसने (Congress) 5 वर्षात पंजाबमधील (Punjab) राजकीय वातावरण बिघडवले आहे. आम्ही जनतेला आश्वासन देतो, आप सरकार शांतता आणि बंधुभाव राखेल.' पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.