corona
corona  Dainik Gomantak
देश

कोरोनामुळे 11 हजार 715 उद्योजकांनी केली आत्महत्या!

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: कोरोनामुळे (Corona) सर्व जगाचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही कोरोनाचे सावट कायम असून, त्यामध्ये अनेक नव्या व्हेरिएंटची मात्र भर पडत आहे. भारतात कोरोनाचा मोठा फटका उद्योग क्षेत्राला बसला आहे. हजारो उद्योग तर कायमचेच बंद झाले आहेत. तर लाखो लोकांचा रोजगार हिरावला गेला. यामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, केंद्र सरकारने (Central Government) NCB चा अहवालमध्ये याची माहिती दिली आहे. सन 2020 मध्ये कोरोना काळात कृषी क्षेत्रापेक्षा ही उद्योग क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारची आकडेवारीनुसार, कोरोना आणि लॉकडाउनमुळे उद्योग क्षेत्राने मोठा आर्थिक फटका सहन केला आहे.

केंद्र सरकारची माहितीनुसार, सन 2020 मध्ये एकूण 11 हजार 716 उद्योजकांनी आत्महत्या(Suicide) केली आहे. अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. कोरोना संकट येण्यापूर्वी म्हणजे 2019 ची तुलना केल्यास ही आकडेवारी 29 टक्क्यांनी वाढली आहे. गृह मंत्रालयाने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) डेटाच्या माहितीनुसार, 2010 मध्ये 9052 उद्योजकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 2020 मध्ये 11 हजार 716 उद्योजकांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तुलनेत उद्योजकांच्या आत्महत्येचा आकडा हा जास्त आहे. तर 2020 मध्ये 10हजार 667 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

कृषी क्षेत्राशी तुलना

कृषी क्षेत्र (Agriculture) आणि उद्योजक यांच्या आत्महत्येची तुलना केली तर 29.4 टक्क्यांची वाढ झाली, अशी माहिती देण्यात दिली आहे. सन 2020 मध्ये आत्महत्या(Suicide) केलेल्या 11 हजार 716 उद्योजकांपैकी 4226 दुकानदार, 4356 व्यापारी आणि 3134 जण इतर व्यवसायिक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT