thirteen year old boy murdered 8 year old child Dainik Gomantak
देश

13 वर्षीय मुलाने केली 8 वर्षाच्या मुलाची हत्या

चौकशीत अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली.

दैनिक गोमन्तक

घरातून आईचे पैसे चोरल्याचा आरोप केल्याने संतप्त होऊन 13 वर्षीय मुलाने आरोप केलेल्या आठ वर्षांच्या मुलाची हत्या केली. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर आईने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. (thirteen year old boy murdered 8 year old child)

चौकशीत अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी (Police) आठ वर्षीय मुलाचा मृतदेह जंगलातून बाहेर काढला. बाल न्यायालयात हजर केल्यानंतर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

चौकशीत अल्पवयीन मुलाने सांगितले की, मृताच्या आईचे पैसे काही दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. हे पैसे तू चोरलेस, असा आरोप मृताने 13 वर्षीय मुलावर केला होता. याचा त्याला खूप राग आला आणि त्याला मुलाचा बदला घ्यायचा होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कुतुबगढ परिसरात आठ वर्षांचा मासूम आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता, तर अल्पवयीन त्याच्या शेजारी होता. शनिवारी रात्री महिलेने (Woman) पोलिसांना फोन करून आठ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती दिली. महिलेने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सांगितले की, दुपारी तिचा मुलगा घराबाहेर खेळत होता. काही वेळाने तो गायब झाला.

रात्रीपर्यंत मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मुलगा न सापडल्याने महिलेने पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. महिलेने सांगितले की काही लोकांनी तिच्या मुलाला शेजारी राहणाऱ्या एका मुलासोबत जाताना पाहिले होते.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि मुलाच्या घराभोवती असलेले सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे तपासले. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाची चौकशी केली. प्रथम अल्पवयीन मुलाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT