Manali Silent Villages Dainik Gomantak
देश

Manali Silent Villages: मनालीतील 'ही' 9 गावे पुढील 42 दिवस चिडीचूप! जाणून घ्या नेमके कारण...

टीव्ही, मोबाईल फोनही राहणार बंद; पर्यटकांनाही पाळावे लागणार नियम

Akshay Nirmale

Manali Silent Villages: हिमाचल प्रदेशातील मनालीजवळील गोशाळे आणि लगतच्या 8 गावांमध्ये आता दीड महिना शांतता पाहायला मिळणार आहे. येथे कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू येणार नाही. या गावांमध्ये ना टीव्ही, ना मोबाईल फोन किंवा मंदिराची घंटादेखील ऐकू येणार नाही. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या पर्यटकांनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे. देवांच्या आदेशामुळे मनालीमध्ये ही पुर्वापार परंपरा जोपासली जात आहे.

मनालीच्या उझी खोऱ्यातील नऊ गावे आजही हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या देव परंपरेचे पालन करत आहेत. ऐतिहासिक गाव गौशाळमध्ये मकर संक्रांतीनंतर पुन्हा एकदा टीव्ही बंद करण्यात आला आहे. यासोबतच मोबाईल फोनही सायलेंट मोडवर ठेवण्यात आले आहेत. तसेच, येथे कोणीही मोठ्याने बोलू शकत नाही. पुढील दीड महिना शेतीची कामे होणार नाहीत.

मंदिरात पुजेबरोबरच घंटाही बांधून टाकण्यात आल्या आहेत. वास्तविक हे आदेश येथील आराध्य दैवत मानले जात असलेले गौतम ऋषी, ब्यास ऋषी आणि नाग देवता यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ही परंपरा पुर्वापार चालत आली आहे. आताही या गावातले ग्रामस्थ आगामी दीड महिना या आदेशाचे पालन करतील.

या 9 गावांना आदेश

मनालीच्या गौशाल, कोठी, सोलांग, पलचन, रुआड, कुलंग, नाशनाग, बुरुआ आणि मझाच या गावांमध्ये देव परंपरा खूप चांगल्या प्रकारे पाळली जाते. तरुण पिढीही शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा पाळत आहे. येथे येणारे पर्यटक देखील ही परंपरा पाळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये या परंपरेचे पालन केले जात असल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT