Goa  Dainik Gomanatak
देश

गोव्यासह भारतातील ही 6 राज्ये पर्यटनासाठी सुरक्षित; दुसऱ्या डोससह 100% लसवंत

हिमाचल प्रदेश, गोवा आणि जम्मू-काश्मीर या तीन राज्यांमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येतात.

दैनिक गोमन्तक

गेल्या वर्षी जानेवारीपासून भारतात कोरोनाविरुद्ध लसीकरण (Vaccination) मोहीम सुरू आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असलेले भारत सरकार 15 वर्षांवरील सर्व लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत देशभरात सुमारे 168 कोटी कोरोना लसीचे डोस लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोठी उपलब्धीही झाली आहे. भारतातील 6 राज्यांमध्ये पूर्णपणे म्हणजे 100% लसीकरण करण्यात आले आहे. या राज्यांमध्ये, कोरोनाचा दुसरा डोस देखील 100% लागू करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या कोविड-19 च्या तपशीलवार अहवालात असे सांगण्यात आले आहे की, देशातील 6 पूर्ण लसीकरण झालेल्या राज्यांमध्ये, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू आणि काश्मीर, चंदीगड, हिमाचल प्रदेश आणि गोव्याचा समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये पर्यटक पोहोचले असले तरी यातील ३ राज्ये पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय खास आहेत. हिमाचल प्रदेश, गोवा आणि जम्मू-काश्मीर ही तीन राज्यामध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येतात. अशा परिस्थितीत ही राज्ये पूर्णपणे कोरोना लसीकरण झाल्यामुळे सुरक्षित आहेत, ही पर्यटकांसाठी दिलासादायक बाब आहे.

एवढेच नाही तर 20 राज्यांमध्ये लसीकरण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. या राज्यांव्यतिरिक्त इतर 14 राज्यांमध्ये कोरोना लसीकरण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत भारतातील 76 टक्के लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. म्हणजेच 15 वर्षांवरील 76 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. या 6 राज्यांमध्ये संपूर्ण लसीकरण झाल्यानंतर, एकूण 20 राज्ये अशी आहेत जी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत. यामध्ये सिक्कीम, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, दिल्ली, हरियाणा, दादरा आणि नगर हवेली, लडाख, राजस्थान आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे.

या सहा राज्यांमध्ये लवकरच 100% लसीकरण होणार

आहे. सिक्कीम राज्यात 15 वर्षांवरील 95 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात दोन्ही डोसपैकी 94 टक्के लसीकरण झाले आहे. याशिवाय गुजरातमध्ये 93 टक्के आणि उत्तराखंडमध्ये 92 टक्के लसीकरण झाले आहे. कर्नाटकात 89 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. अशा परिस्थितीत, ही 6 राज्ये लवकरच 100% लसवंत राज्यांमध्ये सामील होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT