Mayamkottu Malancharuvu Malanad Temple Dainik Gomantak
देश

दक्षिण भारतात महाभारत घडवणाऱ्या शकुनी मामाचे मंदिर ! जाणून घ्या खासियत

दुर्योधनाचा (Duryodhana) मामा शकुनीची पूजा केली जाते. इथे शकुनी मामाची विधीपूर्वक पूजा केली जाते.

दैनिक गोमन्तक

आपल्या देशात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या देवी-देवतांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दक्षिण भारतात असे एक मंदिर आहे, जिथे देव-देवतांचे नसून महाभारतात महाभारत घडविणाऱ्याचे मंदिर आहे. दुर्योधनाचा मामा शकुनीची पूजा केली जाते. इथे शकुनी मामाची विधीपूर्वक पूजा केली जाते. परंपरेनुसार नारळ, रेशीम आणि ताडी अर्पण केली जाते. शकुनी मामाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असेही इथे मानले जाते. हे मंदिर केरळच्या (Kerala) कोल्लममध्ये आहे. तसेच हे मंदिर 'मायामकोट्टू मलंचरुवू मलानाद' मंदिर म्हणून ओळखले जाते. (There Is A Temple Of Kauravas Uncle Shakuni In Kollam Kerala)

शकुनी मंदिर केरळमध्ये

असे म्हणतात की, महाभारत (Mahabharata) युद्ध संपले तेव्हा शकुनी मामाला खूप पश्चाताप झाला होता. त्याचे मन त्याला आतून विचारांनी ग्रासले होते. या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. यासोबतच साम्राज्याचे पूर्णपणे नुकसान झाले होते. या घटनेनंतर शकुनीने पश्चात्ताप करण्यासाठी गृहस्थ जीवनाचा त्याग केला आणि संन्यास घेतला. असे म्हटले जाते की शकुनी शांतीसाठी भगवान शंकराच्या तपश्चर्येत लीन झाले. दरम्यान, शकुनीच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी त्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. शकुनीने जिथे तपश्चर्या केली होती, आता तिथे एक मंदिर स्थापित केले आहे, जे केरळ राज्यातील कोल्लममध्ये आहे. आज हे मंदिर मायामकोट्टू मलंचरुवू मलानाद मंदिर म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर ज्या दगडावर शकुनीने भगवान शंकराची तपश्चर्या केली होती, तो दगड आज पवित्रस्वरम म्हणून ओळखला जातो, ज्यासाठी दूरदूरवरून लोक इथे पूजा करण्यासाठी येतात.

शकुनी मामा कसा बदलला?

रक्तरंजित महाभारत युद्धामुळे आलेल्या स्तब्धतेनंतर, शकुनीने मोहित मन शांत करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाची तपश्चर्या केली. त्यांनी तपश्चर्येसाठी जी जागा निवडली होती, ती जागा आज कोल्लममधील पवित्रस्वरम आहे.

मलाक्कुडा महालसवम उत्सव

शकुनी मामाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली होती, त्या ठिकाणी सध्या मंदिर आहे, ज्याला मायामकोट्टू मलंचरुवू मलानाद मंदिर म्हणतात. या ठिकाणी दरवर्षी मलाक्कुडा महालसवम नावाचा भव्य उत्सव आयोजित केला जातो. या उत्सवात सहभागी होण्यासाठी इथे लोकांची गर्दी होत असते. केरळमधील कोल्लममध्ये हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते पवित्रस्वरम म्हणून ओळखले जाते. मंदिरात शकुनीशिवाय देवी माता, नागराज आणि किरतमूर्ती यांची पूजा केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT