मुलांच्या शिक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे 'जगत मामा' अनंतात विलीन

राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील जयल शहरातील राजोद गावात राहणाऱ्या पूर्णाराम गोदारा यांचा जीवन प्रवास असा होता की, त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग केला.
Purnaram Godara
Purnaram GodaraTwitter/ @hanumanbeniwal
Published on
Updated on

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, एखाद्या व्यक्तीचे आयुष्य असे असावे की, तो गेल्यानंतर पिढ्यानपिढ्या त्याच्या कार्याची आठवण ठेवतात. आजच्या चकचकीत जगात साधेपणाचा आदर्श ठेवणारे फार कमी आहेत. आम्ही बोलतोय ते 'जगत मामा' बद्दल, ज्यांच्या कार्यामुळे त्यांना हे नाव मिळाले. मात्र आज त्यांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतर सर्वांचे डोळे ओलावले आहेत. राजस्थानातील (Rajasthan) नागौर जिल्ह्यातील जयल शहरातील राजोद गावात राहणाऱ्या पूर्णाराम गोदारा यांचा जीवन प्रवास असा होता की, त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग केला. (Purnaram Godara Who Sacrificed Everything For The Education Of His Children Passed Away)

शिक्षणाचे महत्त्व समजून मुलांमध्ये वाचनाची भावना रुजवणाऱ्या पूर्णाराम गोदारा यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. पूर्णाराम गोदरा (Purnaram Godara) हे दीर्घकाळ आजारी होते. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Purnaram Godara
मला निवडून द्या! जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करेन

शिक्षणासाठी 300 बिघे जमीन दान केली

पूणराम गोदरा यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे सांगितले जाते. मीडिया रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णाराम गोदारा यांनी आतापर्यंत शाळकरी मुलांना 4 कोटी रुपयांची रोख बक्षिसे दिली आहेत. याशिवाय गोदरा यांनी त्यांची 300 बिघा वडिलोपार्जित जमीन शाळकरी मुलांच्या नावे केली होती. पूर्णाराम गोदारा यांच्या जवळचे लोक सांगतात की, ते स्वतः अशिक्षित होते परंतु त्यांना शाळेतील मुलांवर अपार प्रेम होते.

पूर्णाराम गोदरा यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते घराबाहेर पडताना कोणत्याही आमंत्रणाशिवाय नागौर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत जात आणि तेथे शिकणाऱ्या मुलांना बक्षीस देऊन येत असत. त्याचबरोबर गावातील कोणत्याही शाळेत कोणतीही स्पर्धा असली की, ते त्यांच्या वतीने घरीच खीरपुरी बनवत असत. दुसरीकडे गरीब मुलांची शाळेची फी, पुस्तके, ड्रेस, स्टेशनरी, दप्तरांची व्यवस्था पूर्णराम गोदरा करत असे.

Purnaram Godara
नवीन पेन्शनधारकांनाही मिळू शकते जुनी पेन्शन; जाणून घ्या अट

का जगत मामा म्हणून प्रसिद्ध झाले

पूर्णाराम गोदरा यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यांनी आयुष्यभर लग्न केले नाही. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले. ते प्रत्येक मुलाला आपला पुतण्या किंवा भानू म्हणून हाक मारायचे, त्यामुळे गावातील सर्व मुलेही त्यांना काका म्हणू लागली आणि हळूहळू गावातील लोकांनी त्यांचे नाव जगत मामा ठेवले. आज पूर्णाराम गोदरा यांच्या निधनानंतर संपूर्ण नागौर जिल्ह्यात शोकाकुल वातावरण आहे.

शिवाय, त्यांच्या निधनावर नागौरच्या नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिकांनी शोक व्यक्त केला. नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल, माजी खासदार सीआर चौधरी आणि ओसियन आमदार दिव्या मदेरणा यांनीही शोक व्यक्त केला. त्याचबरोबर पूर्णाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांची कथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करुन जयल शासकीय महाविद्यालयाला जगत मामा पूर्णाराम गोदरा यांचे नाव देण्याची मागणीही ग्रामस्थांनी शासन व लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com