व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केरळमध्ये एका जोडप्याचे अनोखे लग्न पार पडणार आहे. केरळच्या मनू कार्तिक आणि श्यामा एस. 14 फेब्रुवारीला प्रभू विवाहबंधनात अडकणार आहेत. हे मल्याळी ट्रान्सजेंडर जोडपे आहे. देशातील एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायासाठी कायदा लागू झाल्यानंतरही जिथे लोक समाजासमोर येऊन आपले नाते उघडपणे सांगत नाहीत, तिथे मात्र या जोडप्याने त्यांच्या विवाहाची नोंदणी ट्रान्सजेंडर श्रेणीमध्ये करण्याचा निर्णय घेतला. भारतात ट्रान्सजेंडर कॅटेगरीत लग्नाची नोंदणी करण्याची ही पहिलीच वेळ असेल. (The Transgender Couple From Kerala Will Get Married On February 14)
दरम्यान, भारतात ट्रान्सजेंडर पर्सन राइट्स बिल 2014 आणि ट्रान्सजेंडर पर्सन (Protection Of Rights) कायदा 2019 लागू झाल्यानंतर, LGBTQ समुदायाचे अनेक विवाह झाले, परंतु हे विवाह केवळ स्त्री आणि पुरुष म्हणून नोंदणीकृत झाले. केरळच्या (Kerala) मनू कार्तिक (Manu Karthik) आणि श्यामा एस. परमेश्वर (Shyama S. Parameshwara) या समाजासाठी प्रेरणादायी ठरतील.
एक एचआर आणि दुसरा प्रकल्प अधिकारी
त्रिशूनमध्ये राहणारा मनू हा एका बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर आहे. तर तिरुअनंतपुरममधील श्यामा केरळच्या सामाजिक न्याय विभागाच्या ट्रान्सजेंडर सेलच्या राज्य प्रकल्प अधिकारी आहेत. दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. मनूने सांगितले की, चार वर्षांपूर्वी मी श्यामाला प्रपोज केले होते. परंतु, श्यामाने उत्तर दिले नव्हते. श्यामा ही घरात मोठी असून तिच्यावर कुटुंबाची जबाबदारीही आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर श्यामाने गेल्या वर्षी लग्नाला होकार दिला होता.
संघर्षातून निर्माण झाली ओळख, आईने दिली साथ
मनूने सांगितले की, 'ट्रान्सजेंडरसाठी समाजात टिकून राहणे खूप कठीण आहे. परंतु माझी आई क्षणोक्षणी माझ्या पाठीशी उभी होती. मला आई सतत अभ्यास करायला सांगायची. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण आपल्या कर्तृत्वाचा आपला ठसा उमटवत असतो. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावरच मी एका बहुराष्ट्रीय कंपनीचा एचआर बनू शकलो. मनूने पुढे सांगितले की, श्यामाचीही कथा माझ्यासारखीच आहे. तिनेही अभ्यासाच्या जोरावर आपले समाजात स्थान निर्माण केले, कुटुंबाचा सांभाळ केला.
जन्मपत्रिकेनुसार लग्नाची तारीख
मनू पुढे सांगते की, ''लग्न करणे सोपे नव्हते. आम्हाला आमच्या कुटुंबालाही यासाठी तयार करायचे होते. आम्ही लिंग रीअसाइनमेंट सर्जरी देखील केलेली नाही. घरचे लोक तयार झाल्यानंतर आम्ही गेल्या वर्षीच लग्न करणार होतो, परंतु लॉकडाऊन (Lockdown) लागू झाला, त्यामुळे आता आम्ही लग्न करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. खरतंर 14 फेब्रुवारीला लग्न करण्याचा आमचा विचार नव्हता. जन्मपत्रिकेनुसार हा दिवस योगायोगाने आला आहे.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.