जगातील सर्वात लांब अटल बोगद्याला अधिकृतपणे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने 'जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून प्रमाणित केला आहे. संरक्षण मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (Border Roads Organisation) महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी (Lt Gen Rajeev Chaudhry) यांनी बोगद्याच्या बांधकामासाठी बीआरओच्या (BRO) या कामगिरीबद्दल हा पुरस्कार स्वीकारला. (Atal Tunnel Included In World Book Of Records)
दरम्यान, अटल बोगदा हा 10,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला जगातील सर्वात लांब बोगदा आहे. हा बोगदा मनालीला-लेहशी जोडतो. या बोगद्यामुळे मनाली ते लेहमधील अंतर 46 किलोमीटरने कमी होते. आणि प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होते. हा 9.02 किमी लांबीचा बोगदा असून, जो मनालीला (Manali) लाहौल-स्पिती खोऱ्याशी वर्षभर जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
3 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले
समुद्रसपाटीपासून 3,000 मीटर (10,000 feet) उंचीवर हिमालयातील पीर पंजाल रांगेत आधुनिक तंत्रज्ञानाने बोगदा बांधण्यात आला आहे. बोगद्याच्या आतील सुरक्षेकड्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. ते कार्यान्वित झाल्यानंतर मनाली आणि लेहमधील (Leh) अंतर 46 किमीने कमी झाले आहे. सामरिकदृष्ट्याही हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हे सुमारे 10.5 मीटर रुंद आणि 5.52 मीटर उंच आहे. 3 ऑक्टोबर 2020 रोजी पीएम मोदींच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
नव्या वर्षात विक्रमी संख्येने वाहनांनी अटल बोगदा ओलांडला
यावर्षी 1 जानेवारी रोजी विक्रमी संख्येने वाहनांनी अटल बोगद्यामधून प्रवास केला. लाहौल आणि स्पितीचे पोलीस अधीक्षक मानव वर्मा यांनी ही माहिती दिली. वर्मा म्हणाले, 2022 च्या पहिल्या दिवशी एकूण 7,515 वाहनांनी 24 तासांत बोगद्यातून प्रवास केला. 3 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यापासून एका दिवसात रोहतांगमधील अटल बोगदा ओलांडणाऱ्या वाहनांची ही सर्वाधिक संख्या आहे. ते पुढे म्हणाले, 1 जानेवारी रोजी 60,000 हून अधिक लोकांनी या बोगद्यातून प्रवास केला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Modi) तो सर्वसामान्यांसाठी खुला केल्यानंतर हे एक प्रमुख पर्यटन स्थळही बनले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.