Supreme Court Dainik Gomantak
देश

Supreme Court: राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत सुप्रीम कोर्टाने मागितला अहवाल.. वाचा सविस्तर...

यात्रेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील अकोल्यात वीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेदरम्यान भारतभ्रमण करीत आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली तेव्हा त्यांनी वीर सावरकांवर मोठा आरोप केला होता. या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने हजरतंगज पोलिसांकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे. यात्रेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील अकोल्यात वीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणी राहुल गांधींविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यानंतर न्यायालयाने पोलिसांकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे.

सदरच्या वादग्रस्त टिपण्णीबाबत सुनावणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींना आपला पक्ष मजबूत करायचा आहे, कारण आगामी काळात म्हणजेच २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, ज्यासाठी राजकीय पक्षांनी तयारी केली आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली तेव्हा त्यांनी वीर सावरकांवर मोठा आरोप केला होता. समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने राहुल गांधींनी हे वक्तव्य केले आहे. या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने हजरतंगज पोलिसांकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे.

राहुल गांधींनी वीर सावरकांवर केले हे मोठे आरोप - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल यांनी आरोप केला की, तुरुंगात असताना सावरकरांनी घाबरून माफीनाम्यावर स्वाक्षरी करून महात्मा गांधी आणि इतर समकालीन नेत्यांचा विश्वासघात केला आणि ते भारताविरुद्ध उभे राहण्याची योजना आखत होते.

राहुल गांधी यांनी यापूर्वीही सावरकरांवर अनेकदा निशाणा साधला आहे. या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT