Supreme Court Dainik Gomantak
देश

"प्रेमभंग, ब्रेकअप जीवनाचा भाग," प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराची सुटका

Ashutosh Masgaunde

Supreme Court has said that break up is a part of the daily life, Advising to marry only on the advice of parents is not inciting suicide:

प्रेमभंग हा माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रेयसीला तिच्या पालकांच्या सल्ल्यानुसारच लग्न करण्याचा सल्ला देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे. अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने आरोपी प्रियकरावर सुरू असलेला खटला रद्द केला.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणात प्रियकराने प्रेयसीला तिच्या पालकांच्या पसंतीनुसार लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर प्रेयसीने आत्महत्या केली होती.

खंडपीठाने म्हटले की, तुटलेली नाती आणि प्रेमभंग हे दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. अपिलार्थी तरुणाशी नाते तोडून प्रेयसीला तिच्या आई-वडिलांच्या सल्ल्यानुसार लग्न करण्याचा सल्ला देणे याला आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही.

खंडपीठाने पुढे सांगितले की, या प्रकरणात कलम ३०६ अंतर्गत गुन्हा घडत नाही. खंडपीठाने आरोप आणि कायद्याचा विचार केल्यानंतर अपीलकर्त्याची कोणतीही सक्रिय भूमिका नसल्याचे मान्य केले. आत्महत्येस प्रवृत्त करणारी कृती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असावी तेव्हाच त्याला गुन्हा म्हणाता येईल, असेही न्यायालय म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जेथे उच्चारलेले शब्द सामान्य स्वरूपाचे असतात, अनेकदा भांडणारे लोक रागाच्या भरात वापरतात आणि त्यामुळे काही गंभीर घटनेची अपेक्षा नसते, त्यामुळे ते आत्महत्येला प्रवृत्त करण्यासारखे ठरणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने कमलाकर प्रकरणाचा दाखला देत, स्पष्ट केले की, एखाद्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी, फिर्यादीने आत्महत्येत आरोपीची भूमिका असल्याचे सिद्ध केले पाहिजे.

आरोपीच्या कृतींमध्ये IPC च्या कलम 107 मध्ये नमूद केलेल्या तीन निकषांपैकी एकाचा समावेश असला पाहिजे. याचा अर्थ असा की आरोपीने एकतर त्या व्यक्तीला स्वतःचा जीव घेण्यास प्रोत्साहित केले, इतरांसोबत कट रचल्याने त्या व्यक्तीने आत्महत्या केली किंवा असे कृत्य जामुळे एखाद्याने आत्महत्या केलेली असवी, असे न्यायालयाने म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT