MLA Disqualification Petition: सभापतींसह 8 फुटिरांना नोटीस; सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' निर्देश

आमदार अपात्रताप्रश्‍नी डिसेंबरपर्यंत मत मांडा : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
MLA Disqualification in Goa
MLA Disqualification in Goa Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

MLA Disqualification Petition: सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या 8 आमदारांसह सभापती रमेश तवडकर यांना आज सर्वोच्च न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपले मत मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

काँग्रेसमधून 15 सप्टेंबर 2022 रोजी दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, केदार नाईक, आलेक्स सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

या फुटीर आमदारांच्या विरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर सभापती तवडकर यांनी निर्णय न घेतल्याने चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ही याचिका न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एस.व्ही.एन. भट्टी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणीस आली होती. यावर प्रतिवादींना नोटीस बजावून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मत मांडण्यास सांगितले आहे. या पक्षांतरामुळे विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ ११ वरून घसरून ३ वर आले आहे, तर भाजपचे संख्याबळ २० वरून २८ झाले आहे.

तवडकर यांच्याकडून नोटिसाही नाहीत

उच्च न्यायालयाने 2 मे 2023 च्या निकालात सभापती रमेश तवडकर यांनी अपात्रता याचिकेवर जलदगतीने निर्णय घ्यावा, असे नमूद केले होते आणि या याचिकांवर तीन महिन्यांत निर्णय घ्यावा लागेल, असे म्हटले होते. तरीही अपात्रतेची ही याचिका पुढे सरकलेली नाही. प्रत्यक्षात आजपर्यंत सभापतींनी संबंधित आमदारांना याप्रकरणी नोटिसाही बजावलेल्या नाहीत.

MLA Disqualification in Goa
Pernem Zoning Plan: आठवडाभराच्या राजकीय नाट्याला पूर्णविराम, पेडणे विभागीय नियोजन आराखडा अखेर रद्द

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dhyan Foundation Goa Case
Tarun Tejpal Supreme Court Case
Murda Santa Cruz Illegal Road
Mormugao Raja Ganeshotsav Pandal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com