Rohit Sharma , Hardik Tamore
Rohit Sharma , Hardik TamoreDainik Gomantak

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Rohit Sharma Duplicate: नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
Published on

नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोत २ रोहित शर्मा दिसत असल्याची चर्चा झाली.

मात्र हा फोटो रोहित शर्मा आणि त्याच्यासारखाच दिसणारा हार्दिक तामोर या युवा विकेटकिपर फलंदाजाचा असल्याचे समोर आले. या फोटोमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, अनेकांनी हार्दिकला ‘रोहित शर्माचा हमशक्ल’ असे संबोधले आहे.

हार्दिक तामोर हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्यात आला असता, त्याने या विषयावर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.

हार्दिक म्हणाला, “रोहित शर्मा माझा फेव्हरेट खेळाडू आहेच. मी रोहित शर्मासारखा दिसतोय, असं लोकांकडून ऐकून मला खरंच चांगलं वाटलं.” तसेच त्याने पुढे सांगितले की, “रोहित शर्मासारखा मी फक्त ३ टक्के जरी बनलो, तरी ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल.”

Rohit Sharma , Hardik Tamore
Rohit Sharma: "रोहित को बोलिंग दो"! शून्यावर आउट गेला तरी 'हिटमॅन'ची क्रेझ कायम; प्रेक्षकांनी केली गोलंदाजी देण्याची मागणी

रोहित शर्माच्या शैलीतील शांत नेतृत्व, दमदार फलंदाजी आणि व्यक्तिमत्त्व याची प्रेरणा मिळते, असेही हार्दिकने नमूद केले. या व्हायरल फोटोमुळे हार्दिक तामोरला अचानक प्रसिद्धी मिळाली असून, भविष्यात तो आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com