Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Cigarette Price Hike India: संसदेने केंद्रीय उत्पादन शुल्क (दुरुस्ती) विधेयक, 2025 ला मंजुरी दिल्यानंतर देशातील सिगारेटप्रेमींना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
Cigarette price hike india
Cigarette price hike indiaDainik Gomantak
Published on
Updated on

संसदेने केंद्रीय उत्पादन शुल्क (दुरुस्ती) विधेयक, 2025 ला मंजुरी दिल्यानंतर देशातील सिगारेटप्रेमींना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सादर केलेल्या या विधेयकामुळे सिगारेटसह सिगार, हुक्का तंबाखू आणि चघळण्याच्या तंबाखूवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे.

नव्या तरतुदीनुसार 1,000 सिगारेट्सवरील उत्पादन शुल्क सध्या असलेल्या 200 ते 735 रुपयांवरून थेट 2,700 ते 11,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. ही वाढ सिगारेटच्या लांबी आणि प्रकारानुसार ठरणार आहे. चघळण्याच्या तंबाखूवरील शुल्कात चौपट वाढ करत 25 टक्क्यांवरून 100 टक्के करण्यात आली आहे.

Cigarette price hike india
E-Cigarette at Goa Airport: अंतर्वस्त्रात ई-सिगारेट लपवून नेणाऱ्या दोन महिलांना मोपा विमानतळावर अटक; गुन्ह्याची नोंद

हुक्का तंबाखूवरील शुल्क 25 टक्क्यांवरून 40 टक्के, तर स्मोकिंग मिक्सचर्सवरील शुल्कात पाच पट वाढ करत 60 टक्क्यांवरून 300 टक्के करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार सध्या 18 रुपयांची सिगारेट लवकरच 70 रुपयांहून अधिक किमतीला मिळू शकते.

Cigarette price hike india
SOPO Tax: दक्षिण गोव्यातील 'सोपो' प्रकरणात घोटाळ्याची शक्यता! निविदा जारी करण्यास विलंब; SGPDAचे आर्थिक नुकसान

या दरवाढीवर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काहींनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे म्हणत “कदाचित यामुळे सवय सुटेल” अशी प्रतिक्रिया दिली, तर काहींनी “धूम्रपान करणाऱ्यांवर याचा फारसा परिणाम होणार नाही” असे मत व्यक्त केले. काहींनी सरकारच्या हस्तक्षेपावर नाराजी दर्शवली, तर काहींनी विनोद करत “आता बिडी पिण्याची वेळ आली” अशा मिश्कील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com