Champai Soren|Hemant Soren|ED Jharkhand Politics Dainik Gomantak
देश

Champai Soren: गोष्ट 'झारखंड टायगर'ची... कोण आहेत झारखंडचे होणारे मुख्यमंत्री चंपाई सोरेन

Hemant Soren: याआधी सोरेन कुटुंबाबाहेर जी नावं चर्चेत होती, त्यात चंपाई यांचे नाव आघाडीवर होतं. हेमंत सोरेन यांच्या सर्वात खास व्यक्तींपैकी ते एक आहेत.

Ashutosh Masgaunde

चंपाई सोरेन हे झारखंडचे पुढील मुख्यमंत्री असणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने हे पाऊल उचलले आहे.

चंपाई हे हेमंत सोरेन यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. चंपाई सध्याच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत होते. चला तर चंपाई सोरेन यांच्याबद्दल जाणून घेऊया.

कोण आहेत चंपाई सोरेन?

चंपाई सोरेन झारखंड विधानसभेचे सदस्य आहेत. सध्या ते झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाकडून सरायकेला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून ते हेमंत सोरेन सरकारमध्ये परिवहन, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण विभागाची जबाबदारी सांभाळत होते.

'झारखंड टायगर' म्हणून ओळख

बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरत असताना चंपाई यांचे नाव चर्चेत आले. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपाई यांनीही झारखंडमधील आंदोलनात भाग घेतला होता. त्यानंतर लोक त्यांना 'झारखंड टायगर' म्हणू लागले.

2005 मध्ये पहिल्यांदा आमदार

2005 मध्ये चंपाई पहिल्यांदा झारखंड विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 2009 मध्येही ते आमदार झाले. सप्टेंबर 2010 ते जानेवारी 2013 या कालावधीत त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, कामगार आणि गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. ते जुलै 2013 ते डिसेंबर 2014 या कालावधीत अन्न आणि नागरी पुरवठा, परिवहन मंत्री होते.

2014 मध्ये ते झारखंड विधानसभेसाठी तिसऱ्यांदा निवडून आले. 2019 मध्ये ते चौथ्यांदा आमदार झाले. यासह ते हेमंत सरकारमध्ये परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री झाले. 2019 मध्ये, चंपाई यांनी आपली मालमत्ता 2.55 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते.

शिबू सोरेन यांच्यासोबत दीर्घकाळ काम

अवैध जमीन घोटाळ्यात अडकलेले हेमंत सोरेन यांनी बुधवारी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावेळी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेस आघाडीने परिवहन मंत्री चंपाई सोरेन यांची सोरेन सरकारमधील विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली.

याआधी सोरेन कुटुंबाबाहेर जी नावं चर्चेत होती, त्यात चंपाई यांचे नाव आघाडीवर होतं. हेमंत सोरेन यांच्या सर्वात खास व्यक्तींपैकी ते एक आहेत. चंपाई यांनी हेमंत यांचे वडिल आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेनसोबत दीर्घकाळ काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT