Shiva Temple Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीरमध्ये घडलं अनोखं दर्शन ! मुस्लिम पिता-पुत्र करतायेत शिवमंदिराची देखभाल

वास्तविक, श्रीनगरमध्ये (Srinagar) असलेल्या मंदिराची देखभाल पुजारी किंवा पंडित नव्हे तर मुस्लिम पिता-पुत्र करत आहेत.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) प्रेम, सौहार्द आणि एकतेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. देवाच्या भक्तीची आणि प्रेमाची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील, परंतु ही कथा जाणून घेतल्यावर तुम्हाला अभिमान वाटेल की, हे आपल्या भारताचे वैशिष्ट्य आहे. वास्तविक, श्रीनगरमध्ये (Srinagar) असलेल्या मंदिराची देखभाल पुजारी किंवा पंडित नव्हे तर मुस्लिम पिता-पुत्र करत आहेत. निसार अहमद अलई (Nisar Ahmed Alai) (34) हे गेल्या अनेक महिन्यांपासून एका शिवमंदिराची (Shiva Temple) देखभाल करत आहेत. विशेष म्हणजे निसार बोलू आणि ऐकूही शकत नाही. (The Shiva Temple In Srinagar Is Maintained By Muslim Father And Son)

दरम्यान, वडिलांनंतर निसार यांनी शिवमंदिराची देखभाल केली आहे. निसार यांच्या वडिलांनी सहा वर्षांहून अधिक काळ मंदिराची देखभाल केली. तसेच संपूर्ण कामाची जबाबदारीही घेतली. हे शिवमंदिर जबरावान टेकडीवर वसलेले एक छोटेसे मंदिर आहे. निसार मंदिर परिसर स्वच्छ करतात. बागांची काळजी घेतात. त्याचबरोबर भाजीपालाही विकतात. हे मंदिर काश्मीरमधील परस्पर बंधुतेचे दर्शन घडवते, असे स्थानिक लोक मानतात.

हे मंदिर काश्मीरच्या बंधुत्वाचे प्रतीक

स्थानिक रहिवासी फिरदौस यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ते इथे बराच काळ केअरटेकर म्हणून काम करत आहेत. तसेच मंदिराच्या देखभालीचीही पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. हे काश्मीरच्या बंधुभावाचे दर्शन घडवते. जी प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. ते पुढे म्हणाले, 'काही कारणास्तव जर वडील आणि मुलगा मंदिराची देखभाल करु शकत नसतील, तर अशा परिस्थितीत इतर मंदिराच्या देखभालीची संपूर्ण काळजी घेतात.' अन्य स्थानिक रहिवासी उमर म्हणाले की, अशी अनेक उदाहरणे आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये जिथे मुस्लिम समाजाचे लोक हिंदू मंदिरांची पूर्ण काळजी घेतात.

सर्व लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करतात

उमर पुढे म्हणाले, 'आमच्या मुस्लिम (Muslim) समाजातील एक मुलगा या शिवमंदिराची काळजी घेत आहे. ही काही अनोखी घटना नाही, खोऱ्यात अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे हिंदू मंदिरांची देखभाल मुस्लिम समाजातील लोक करत आहेत. इथे सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात. तसेच एकमेकांच्या धर्माचा आदरही करतात. ते आपली जबाबदारी अत्यंत मनापासून आणि जिद्दीने पार पाडत आहेत. मंदिराची जोपासणी करणारी धार्मिक संस्था असलेल्या ईश्वर आश्रम ट्रस्टकडून निसार यांना 8000 रुपये पगार मिळत आहे. विशेष म्हणजे ते पगारावर समाधानी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT