भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना देशातील काही शहरांमध्ये गेल्या आठवड्यात रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ दिसून आली आहे. उदाहरणार्थ, दिल्लीतील (Delhi) शाळांमध्ये (Schools) कोरोना पॉझिटिव्ह मुलांची (Children) संख्या वाढू लागल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे.
दरम्यान, देशातील अव्वल दर्जाचे जैववैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले की, ''XE व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नाही. त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, "XE व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांची वाढत चालली आहे का हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. जेव्हा आमच्याकडे स्पष्ट आकडे येतील, तेव्हाच आम्ही हे सांगू शकू. फक्त त्यासाठी लोकांचा डेटा पुरेसा नाही."
XE व्हेरिएंटबाबत ते म्हणाले, "XE व्हेरिएंट हा Omicron ची उत्पत्ती आहे. Omicron बद्दल आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार, हा एक विषाणू आहे, जो थेट श्वसनमार्गावर परिणाम करतो. "अशा परिस्थितीत, या संसर्गातून ताप आणि अस्वस्थता ही लक्षणे दिसून येतील. मात्र, असा कोणताही गंभीर आजार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला पूर्वीप्रमाणे रुग्णालयातही जावं लागेल.''
"डॉ. कांग पुढे म्हणाले, "मला वाटते की, या लक्षणांवर लक्ष केंद्रित करणे आणि हा तो कोणता व्हेरिएंट आहे, हे सांगण्याची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. ते सांगण्यासाठी तुम्हाला क्लिनिकल माहिती आणि डेटा आवश्यक आहे.''
तसचे ते पुढे म्हणाले की, 'कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढणे हे चौथ्या लाटेचे लक्षण मानले जाऊ शकत नाही.' यासोबतच डॉ. कांग यांनी असेही सांगितले की, ''तुम्हाला संसर्ग झाला असेल किंवा यापूर्वी लसीकरण केलेले असेल तरी पुन्हा संसर्गाची लागण होण्याची शक्यता आहे.'' इतर देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असतानाही देशात रुग्णांची संख्या कमी असण्याचे कारण सांगताना ते म्हणाले की, 'भारताच्या लसीकरण मोहिमेने गेल्या वर्षी एक प्रकारची Hybrid immunity दिली आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.