The Rajasthan Police arrested a man who allegedly acted as a Pakistani spy and gave confidential information to Pakistan's ISI. Dainik Gomantak
देश

Honeytrap: फेसबुकवर साधला प्रेमचा मेळ, ISI ने केला तरुणाचा खेळ; पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवणारा अटकेत

Honeytrap By ISI: नरेंद्र कुमारला पूनमने ती, पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी असून, ती बीएसएफमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते.

Ashutosh Masgaunde

The Rajasthan Police arrested a man who allegedly acted as a Pakistani spy and gave confidential information to Pakistan's ISI:

पाकिस्तानी गुप्तहेर म्हणून काम करण्याच्या आणि बिकानेर सीमेवरील सामरिक आणि गोपनीय माहिती पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) ला दिल्याच्या आरोपाखाली नुकतेच राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने २२ वर्षीय तरुणाला अटक केली.

अतिरिक्त पोलिस महासंचालक एस सेनगाथिर म्हणाले की, गुप्तचर शाखा सतत सीमावर्ती भागात आयएसआयच्या कारवायांवर लक्ष ठेवते.

"दरम्यान सततच्या निरिक्षणानंतर, हे उघड झाले की नरेंद्र कुमार (22) हा सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या दोन महिला एजंट्सच्या सतत संपर्कात आहे. त्यांच्याकडून त्याला हनीट्रॅप केले गेले होते," असे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस सेनगाथिर म्हणाले.

व्यवसायाने बाईक मेकॅनिक आणि भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बिकानेरमधील आनंदगढ खाजुवाला येथील रहिवासी असलेल्या कुमारला पोलिसांनी तात्काळ जयपूर येथील संयुक्त चौकशी केंद्रात आणण्यात आले.

चौकशीदरम्यान, त्याने उघड केले की तो सुमारे दोन वर्षांपूर्वी "पूनम बाजवा" आणि "सुनीता" नावाच्या महिलांच्या फेसबुकद्वारे संपर्कात आला होता.

नरेंद्र कुमारला पूनमने ती, पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी असून, ती बीएसएफमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते.

अतिरिक्त पोलिस महासंचालक एस सेनगाथिर यांनी सांगितले की, पूनमने कुमारशी मैत्री केली आणि त्याच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्याला सीमावर्ती भागाबद्दल संवेदनशील माहिती गोळा करण्यास सांगितले.

त्यानंतर पूनमने नरेंद्रला एक व्हॉट्सअॅप नंबर दिला आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय भूभागाची संवेदनशील माहिती जसे की रस्ते, पूल, बीएसएफ पोस्ट, टॉवर, लष्कराच्या वाहनांचे फोटो आणि प्रतिबंधित ठिकाणांचे फोटो/व्हिडीओ मागितले, जे त्याने वेळोवेळी पुरवले.

दुसरी महिला सुनीता हिने एका राष्ट्रीय वृत्तपत्राची स्थानिक पत्रकार असल्याचे सांगून नरेंद्र कुमारशी मैत्री केली.

नरेंद्रने तिच्यासोबत संवेदनशील माहिती शेअर करावी अशी तिची मागणी होती. नरेंद्र कुमारने अशी माहिती सुनितासोबत शेअर केल्याचे कबूल केले, असे सेनगाथिर म्हणाले.

नरेंद्र कुमारच्या मोबाइल फोनची तांत्रिक तपासणी केल्यानंतर, त्याच्यावर तात्काळ ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, 1923 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT