Earthquake DainiK Gomantak
देश

Earthquake: भूकंपाने हादरले लडाख, कारगिलमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

दैनिक गोमन्तक

मोदी सरकारने नव्याने स्थापन केलेल्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील कारगिलमध्ये सोमवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, संध्याकाळी 6.50 च्या सुमारास 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सध्या भूकंपामुळे (Earthquake) जीवित वा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या महिन्याच्या सुरुवातीला 18 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) किश्तवाड जिल्ह्यात भूकंपाचा धक्का बसला होता. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ''भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. 3.4 तीव्रतेचा भूकंप दुपारी 12.09 वाजता झाला आणि त्याचे केंद्र किश्तवाडमध्ये होते.'' (The quake affected Kargil in the Ladakh Union Territory)

दरम्यान, 14 एप्रिल रोजी ओडिशातील (Odisha) नयागड जिल्ह्यातील दासपल्ला शहरात मध्यम तीव्रतेचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, 3.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू गंजम जिल्ह्यात 10 किमी खोलीवर होता. सकाळी 11.19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सध्या भूकंपामुळे जीवित आणि मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. गेल्या महिन्यात ओडिशातील कालाहांडी आणि नबरंगपूर जिल्ह्यातही 3.5 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.'

कच्छ जिल्ह्यात 3.2 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले

त्याच वेळी, 10 एप्रिल रोजी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात 3.2 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले, परंतु जीवित आणि मालमत्तेच्या हानीची कोणतीही बातमी नाही. दुपारी 12.49 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्याचा केंद्रबिंदू कच्छमधील रापरपासून 12.2 किमी पश्चिम-नैऋत्य दिशेला होता, असे गांधीनगर स्थित इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मिक रिसर्च (ISR) ने सांगितले. ISR च्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात जिल्ह्यात 3.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा हा पाचवा भूकंप आहे. यापूर्वी भूकंपाचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील रापर, दुधई आणि लखपत या शहरांजवळ होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजुणेत थार गाडीची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थ्यांनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT