Tejasvi Surya Dainik Gomantak
देश

Tejasvi Surya: इंडिगो विमानाचे इमर्जन्सी गेट उघडणारा तो प्रवासी भाजपचा खासदार?

काँग्रेस, ओवैसींकडून टीका

Akshay Nirmale

BJP MP Tejasvi Surya: इंडिगो एअरलाईन्सच्या एका फ्लाईटमध्ये चढल्यानंतर भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला होता. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. यावर इंडिगो एअरलाईन्सने स्पष्टीकरण दिले आहे. तर ही घटना समोर आल्यानंतर काँग्रेससह एआयएमआयएम या पक्षाने टीका केली आहे.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, "भाजपच्या व्हीआयपींचे डोके फिरले आहे. एअरलाइनकडे तक्रार करण्याची तुमची हिम्मत कशी झाली? हेच भाजपचे आदर्श आहेत का? त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी अशी तडजोड का केली? पण, तुम्ही भाजपच्या व्हीआयपींना प्रश्न करू शकत नाही?

तर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांनीही ट्विट केले आहे की, "तुम्ही एका विशिष्ट नावाचे असाल तर असे होतेच. (नाव लपवले जाते) जर नाव अब्दुल असते तर विचारायलाच नको... कृपया तुमचा सीट बेल्ट नेहमी बांधून ठेवा."''

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी, इंडिगोच्या एका प्रवाशाने चेन्नईमध्ये फ्लाइटमध्ये चढल्यानंतर चुकून आपत्कालीन दरवाजा उघडला होता. विमान त्यावेळी विमानतळावर होते आणि तिरुचिरापल्लीसाठी उड्डाण करण्यापूर्वी विमानाची पूर्ण तपासणी केली गेली. त्यामुळे विमानाला विलंबही झाला होता.

इंडिगोचे स्पष्टीकरण

इंडिगोने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा प्रवासी 10 डिसेंबर 2022 रोजी चेन्नईहून तिरुचिरापल्लीला फ्लाइट क्रमांक 6E-7339 मध्ये प्रवास करत असताना त्याने चुकून आपत्कालीन दरवाजा उघडला. प्रवाशाने त्याच्या कृत्याबद्दल त्वरित माफी मागितली. या घटनेची नोंद मानक कार्यप्रणालीनुसार करण्यात आली आणि विमानाची अनिवार्य अभियांत्रिकी तपासणीही करण्यात आली. त्यामुळे उड्डाणाला उशीर झाला.

दरम्यान, नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालनालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT