After Triple Murder Villagers Torches Many Houses Dainik Gomantak
देश

Video: बाप-लेक आणि जावयाची गोळ्या झाडून हत्या, तिहेरी हत्याकांडाने संतप्त जमावाने आख्खं गाव पेटवले

Uttar Pradesh Triple Murder: एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, गुरुवारी (१४ सप्टेंबर) रात्री उशिरा वडील, मुलगी आणि जावई यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Ashutosh Masgaunde

The killing of three members of the same family in Uttar Pradesh's Kaushambi district enraged villagers and set several houses on fire:

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, गुरुवारी (१४ सप्टेंबर) रात्री उशिरा वडील, मुलगी आणि जावई यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, यामुळे गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी गावात अनेक घरांना आग लावली.

कौशाम्बी जिल्ह्यातील मोहिउद्दीनपूर गावात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या हत्येमागे जमिनीच्या वादाचे कारण आहे. हे गाव संदीपन घाट पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते. मात्र, या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

हत्येचे वृत्त पसरताच संतप्त ग्रामस्थ जमा झाले आणि मृतदेह पाहून अनेक घरांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

कौशांबी येथील पोलीस अधीक्षक ब्रिजेश श्रीवास्तव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, "चार लोकांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत. ते फरार आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. आम्ही सर्व माहिती गोळा करत आहोत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT