Odisha Train Tragedy Dainik Goomantak
देश

Odisha Train Accident: पतीच्या मृत्यूचा बनाव महागात; पत्नीविरुद्ध पतीने दाखल केला गुन्हा

Coromandel Express Accident: कटक जिल्ह्यातील मनियाबांदा येथील गीतांजली दत्ताने दावा केला होता की तिचा पती विजय दत्ता यांचा 2 जून रोजी अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यांनी एक मृतदेह तिच्या पतीचा असल्याचा दावा केला होता.

Ashutosh Masgaunde

Odisha Train Tragedy: ओडिशा राज्य सरकार आणि रेल्वेने जाहीर केलेल्या नुकसानभरपाईच्या रोख रकमेसाठी बालासोर रेल्वे दुर्घटनेत पतीच्या मृत्यूचा बनाव करण्याचा प्रयत्न करणारी महिला अडचणीत आली आहे.

कटक जिल्ह्यातील मनियाबांदा येथील गीतांजली दत्ताने दावा केला होता की तिचा पती विजय दत्ता यांचा 2 जून रोजी अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यांनी एक मृतदेह तिच्या पतीचा असल्याचेही ओळखले होते. मात्र, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तिचा दावा खोटा असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तिला ताकीद देऊन सोडले असले तरी तिच्या पतीने मनिबांध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिची खरी अडचण झाली. अटकेच्या भीतीने ही महिला आता फरार झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

 पोलिसांनी सांगितले की, हे जोडपे गेल्या 13 वर्षांपासून वेगळे राहत होते. सरकारी पैसा हडप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि त्यांच्या मृत्यूचा बनाव केल्याबद्दल बिजयने गीतांजलीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

मनियाबांदा पोलिस स्टेशनचे प्रभारी बसंत कुमार सत्पथी यांनी सांगितले की, पोलिसांनी गीतांजलीच्या पतीला बालासोर जिल्ह्यातील बहनगा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, मुख्य सचिव पीके जेना यांनी रेल्वे आणि ओडिशा पोलिसांना मृतदेहांवर खोटे दावे करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याआधी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना  5 लाख तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  2 लाखांची भरपाई जाहीर केली होती. दुसरीकडे, रेल्वे मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना  10 लाख नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

कोरोमंडल एक्सप्रेस 2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता एका मालगाडीला धडकली, तिचे बहुतेक डबे रुळावरून घसरले. एकूण 288 लोक या अपघातात मरण पावले आणि 1,200 हून अधिक जखमी झाले.

 कोरोमंडलचे काही डबे एकाच वेळी जात असलेल्या बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसच्या शेवटच्या काही डब्यांवरून घसरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT