आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीकाकुलममध्ये (Srikakulam) गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Cyclone) जोरदार वारे वाहू लागले असून, मुसळधार पाऊस (Heavy rain) देखील पडला.  Dainik Gomantak
देश

'गुलाब' चक्रीवादळाची आंध्र प्रदेशातील किनारपट्टीला दस्तक देण्यास सुरुवात

गुलाब चक्रीवादळाची (Gulab Cyclone) शक्यता लक्षात घेता, NDRF च्या टीमने आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कलिंगपट्टणम जिल्ह्यातील बंडारुवानीपेटा (Bandaruvanipeta) गावात मॉक ड्रिल केले. केंद्र सरकारने या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व तोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमन्तक

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीकाकुलममध्ये (Srikakulam) गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Cyclone) जोरदार वारे वाहू लागले असून, मुसळधार पाऊस (Heavy rain) देखील पडला. आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात लँडफॉल प्रक्रिया सुरू झाली आहे.

गुलाब चक्रीवादळ आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर दस्तक देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की 'गुलाब' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आंध्र प्रदेशचे किनारपट्टी भाग पूर्णपणे तयार आहेत. हवामान विभागाने असेही सांगितले की, बंगालच्या उपसागरावरील खोल दाब शनिवारी 'गुलाब' चक्रीवादळामध्ये (Gulab Cyclone) बदलला, ज्यामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टी भागात (South Odisha coast) 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिणेकडील ओडिशाच्या काही भागात इशारा देखील देण्यात आला आहे, जिथे चक्रीवादळ गुलाबमुळे मोठ्या प्रमाणात विनाश होण्याची शक्यता आहे.

विशाखापट्टणम येथील भारतीय हवामान खात्याने (IMD) चक्रीवादळचा इशारा देत केंद्राचे श्रीनिवास राव यांनी सांगितले की, गुलाब हे चक्रीवादळ पश्चिम दिशेने जाण्याची शक्यता आहे. हे वादळ मध्यरात्री आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि ओडिशा, कलिंगपट्टणम आणि गोपालपूरच्या दक्षिण किनारपट्टी भागात धडकेल, ज्याची प्रक्रिया संध्याकाळी सुरू होईल. आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि दक्षिण किनारपट्टी भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आम्ही मच्छीमारांना दोन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ओडिशामधील गुलाब चक्रीवादळच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या संपर्कात आहेत. मोदी म्हणाले, केंद्र सरकारने या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व तोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

गुलाब चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता, NDRF च्या टीमने आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम जिल्ह्यातील बंडारुवानीपेटा गावात मॉक ड्रिल केले. एनडीआरएफ टीमचे कमांडंट म्हणाले, “हा परिसर संवेदनशील आहे. एनडीआरएफची एक टीम येथे तैनात करण्यात आली आहे. आम्ही येथील लोकांना चक्रीवादळाबद्दल जागरूक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT