कोलकता: परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांना रोमला (Rome) जाण्याची परवानगी दिली नाही. याबाबत ममता बॅनर्जी आणि तृणमूलचे नेते (Trinamool leader) नाराज आहेत. एका स्वयंसेवी संस्थेच्या आमंत्रणावरून ते 6 ऑक्टोबर रोजी रोमला जाणार होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी बंगालच्या राज्य सचिवालयाला पत्र पाठवून परवानगी (Permission) न मिळाल्याची माहिती दिली आहे. त्यांना का परवानगी देण्यात आलेली नाही, हे सध्या उघड झालेले नाही.
6 आणि 7 ऑक्टोबर रोजी रोममध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात पोप आणि जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल संघटनेकडून ममता यांचे अभिनंदनही करण्यात आले. यापूर्वीही ममता बॅनर्जी अनेक वेळा परदेशात गेल्या आहेत. ममता बॅनर्जी तीन वर्षांपूर्वी जर्मनी आणि इटलीला गेल्या होत्या.
त्यावेळी त्यांनी जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथील इंडो-जर्मन वाणिज्य उद्योग कार्यक्रमात भाग घेतला. इटलीच्या मिलान येथे आयोजित शारोदत्सव आणि जागतिक बंगाल व्यवसाय परिषदेतही त्यांनी भाग घेतला. परदेशी गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणूकीसाठी आमंत्रित करण्याकरीता मुख्यमंत्र्यांनी ही भेट दिली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.