The encounter is taking place in Chowgam area for about two hour
Dainik Gomantak
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये (shopian) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. चौगाम भागात सुमारे दोन तास ही चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. घेरलेले दहशतवादी कोणत्या दहशतवादी संघटनेचे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. चकमकीबाबत काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केले आहे की, "शोपियानच्या चौगाम भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल कामावर आहेत."
काल एक अज्ञात दहशतवादी मारला गेला
काल अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला होता. पोलीस निरीक्षक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या व इतरांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, जिल्ह्यातील अरवानी भागातील मुमनहाल गावात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.
"शोध मोहिमेदरम्यान, दहशतवाद्याची उपस्थिती लक्षात येताच त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले," असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्याने आत्मसमर्पण करण्यास नकार देत सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल तो मारला गेला. शहजाद अहमद सेह असे या दहशतवाद्याचे नाव असून तो कुलगाममधील सेहपोरा येथील रहिवासी आहे."
दहशतवादाचा समूळ उच्चाटन करणे हेच आमचे ध्येय- दिलबाग सिंग
त्याच वेळी, अलीकडेच श्रीनगरच्या हरवान भागात झालेल्या चकमकसह वेगवेगळ्या चकमकीत अनेक पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारल्याचा संदर्भ देत, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग म्हणाले,जम्मू-काश्मीरमधून (Jammu Kashmir) दहशतवादाचा नायनाट करणे हे आमचे ध्येय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.