Railway  Dainik Gomantak
देश

रेल्वेचा मोठा निर्णय! वयोवृद्ध, विद्यार्थी, पत्रकारांसह इतर प्रवाशांना मिळणार नाही तिकीटात सूट

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. याचे कारण भारतीय रेल्वेचे देशात पसरलेले जाळे आणि कमी दरांत आरामदायी प्रवास. लोकांच्या पसंतीस उतरलेल्या भारतीय रेल्वेने वयोवृद्ध, विद्यार्थी, पत्रकार यांच्यासह इतर प्रवाशांना अनेक सवलती दिल्या. मात्र आता भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं (Ministry of Railways) या सवलती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रेल्वेकडून 53 श्रेणींमध्ये तिकिटांवर सूट दिली जात होती. मात्र, आता दिव्यांगांच्या केवळ चार श्रेणी आणि रुग्ण व विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींमध्येचं सवलत दिली जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. (The decision was taken by the Indian Ministry of Railways to close the concessions)

या निर्णयाबाबत गेल्या आठवड्यात लोकसभेत (Loksabha) रेल्वे मंत्री (Minister of Railways) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितले की, आधी प्रवाशांना विविध सवलती दिल्यानं तर गोल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे रेल्वेवर मोठा आर्थिक भार पडतं आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सवलत अंतर्गत 60 वर्षांवरील पुरुषांना 40 टक्के आणि 58 वर्षांवरील महिलांना मिळणारी 50 टक्के सवलत आता बंद करण्यात आली आहे.

तसेच युद्धात अथवा दहशतवादी हल्ल्यांमध्ये हुतात्मा झालेल्या पोलीस किंवा निमलष्करी दलातील जवानांच्या पत्नीला सेकंड क्लास आणि स्लिपरमध्ये देण्यात येणारी 75 टक्के सूट ही बंद केली आहे. अशीच सवलत कारगिल युद्ध आणि श्रीलंकेतील कारवाईत हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या पत्नी यांनाही देण्यात येत होती. मात्र या निर्णयामुळे त्यांची ही सवलत बंद झाली आहे.

तसेच बाहेर गावी शैक्षणिक दौऱ्यावर जाणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणारी 50 ते 75 टक्के सवलत ही बंद झाली आहे. तर यूपीएससी (UPSC) किंवा एसएससी (SSC) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसह 35 वय वर्षापर्यंतचे स्कॉलर, भारत सरकारच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला असून सेकंड क्लास तिकीटावरील 50 टक्के सवलत बंद करण्यात आली आहे.

पत्रकार (Journalist) हा समाजाचा चौथा स्मंभ मानला जातो. त्यामुळे केंद्र किंवा राज्य सरकारची मान्यता असलेल्या पत्रकारांना प्रसारमाध्यमांशी संबंधित कामासाठी प्रवास करताना 50 टक्के सूट दिली जात होती. त्याचबरोबर वर्षातून दोनदा पत्नी आणि मुलांसह प्रवास करतानाही सवलत मिळत होती जी बंद करण्यात आली आहे.

'या' प्रवाशांना मिळणार सवलत

इतरांच्या मदतीशिवाय प्रवास करू न शकणाऱ्या दिव्यांग (Specially Abled) लोकांना रेल्वे भाड्यात सवलत मिळणार आहे. अशा लोकांना फर्स्ट आणि सेकंड क्लास एसीमध्ये 50 टक्के आणि इतर क्लासमध्ये 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तर दृष्टिहीन व्यक्ती आणि त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला राजधानी आणि शताब्दी ट्रेनच्या थर्ड एसी आणि चेअर्ड तिकिटांवर 25 टक्के सवलत असेल. तर मानसिकदृष्ट्या दिव्यांग (Mentally Challenge) व्यक्ती त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला मासिक आणि त्रैमासिक पासवर 50 टक्के सवलत मिळणार आहे. अशीच सवलत मूकबधिर व्यक्ती आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही मिळेल.

त्याचबरोबर कॅन्सरग्रस्त रुग्णाला (Cancer patients) आणि त्याच्या सहप्रवाशाला 75 टक्के सवलत मिळणार आहे. स्लीपर क्लास व थर्ड एसीमध्ये 100 टक्के आणि फर्स्ट व सेकंड एसीमध्ये 50 टक्के सूट मिळते.

थॅलेसेमिया रुग्णाला (Thalassemia Patients) फर्स्ट व सेकंड क्लास एसीमध्ये 50 टक्के आणि इतर क्लासच्या तिकिटांवर 75 टक्के सूट मिळते. ही सवलत त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठीही लागू होते. अशीच सवलत हार्ट आणि किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठीही उपलब्ध आहे. हिमोफिलियाचा रुग्ण (Haemophilia Patients) आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशाला रेल्वे तिकिटावर 75 टक्के सूट मिळते.

टीबी (TB Patients) किंवा ल्युपस वल्गारिसनं ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचार किंवा चाचणीसाठी प्रवास करताना रेल्वे तिकिटांवर 75 टक्के सूट मिळते. हीच सूट कुष्ठरोग्रस्तांनाही दिली जाते. एड्स (AIDS) आणि ऑस्टोमी रुग्णांसाठी सेकंड क्लास तिकिटांवर 50 टक्के सूट. अ‍ॅप्लास्टिक अ‍ॅनिमिया आणि सिकलसेल अ‍ॅनिमियाच्या रुग्णांना 50 टक्के सवलत दिली जाते. मात्र, ही सवलत तेव्हाच उपलब्ध होते, जेव्हा रुग्ण मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांद्वारे मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी प्रवास करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT