Viral Video Dainik Gomantak
देश

'प्यार तो होना ही था'! 'सैयारा' चित्रपटानंतर कपल थेट थिएटरमध्येच झाले रोमँटिक, Video व्हायरल

Viral Video Theatre: मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे.

Manish Jadhav

Viral Video Theatre: मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. या चित्रपटाची कथा आणि अप्रतिम गाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. याच चित्रपटाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चित्रपट संपल्यानंतर एका जोडप्याच्या रोमँटिक हालचाली कॅमेरात कैद झाल्या आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

थिएटरमध्ये कपल रोमँटिक झाले

दरम्यान, हा व्हिडिओ सिनेमाघरातील असून चित्रपट संपल्यानंतरचा आहे. यात दिसत आहे की, चित्रपट संपताच एक जोडपे रोमँटिक होते आणि थिएटरमध्येच ते प्रेम व्यक्त करु लागते. व्हिडिओमध्ये मुलगी मुलाला धावत जाऊन मिठी मारताना दिसत आहे. या जोडप्याचा हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया (Social Midea) साईट 'एक्स'वर (@Anshika_in) या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हजारो लोकांनी त्याला लाईकही केले आहे.

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

दुसरीकडे, या व्हिडिओवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने कमेंट करताना लिहिले की, "या जोडप्याने चित्रपटाला (Moive) काही जास्तच गंभीरपणे घेतले असावे." तर दुसऱ्याने लिहिले की, "थिएटर चक्क कॉन्सर्ट हॉल बनले."

दरम्यान, 'सैयारा' चित्रपटाचे टायटल ट्रॅक आणि इतर गाणी सोशल मीडियावर हिट झाली आहेत. या चित्रपटात अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मोहित सूरीच्या या चित्रपटाची तुलना 'आशिकी 2' आणि 'रॉकस्टार' यांसारख्या चित्रपटांशी केली जात आहे. हा चित्रपट आपल्या गाण्यांसाठी आणि जबरदस्त लव्हस्टोरीसाठी खूप प्रशंसा मिळवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT