corona variant Dainik Gomantak
देश

Corona New Variant: चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हेरियंटचा भारतात प्रवेश

केंद्र सरकार अलर्टवर; चीनमधून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी

Akshay Nirmale

Corona New Variant: चीनमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार ठरलेल्या ओमिक्रॉनच्या सब व्हेरियंट BF.7 चे 4 रूग्ण भारतातही आढळून आले आहेत. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरला भारतात BF.7 चे पहिले प्रकरण आढळले आहे. त्यांच्या माहितीनुसार गुजरातमध्ये आतापर्यंत दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर ओडिशातून एक प्रकरण नोंदवले गेले आहे.

या प्रकारातील एक रूग्ण जुलैमध्ये, दोन रूग्ण सप्टेंबरमध्ये आणि एक रूग्ण नोव्हेंबरमध्ये आढळून आला. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत तज्ज्ञांनी सांगितले की कोविड प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण वाढ झालेली नसली तरी विद्यमान आणि उदयोन्मुख पॅटर्नचा मागोवा घेण्यासाठी सतत देखरेख ठेवण्याची गरज आहे. BF.7 हा ओमायक्रॉनच्या BA.5 प्रकाराचा सब व्हेरियंट आहे. ज्यांना लसीकरण केले गेले आहे त्यांनादेखील पुन्हा संसर्ग करण्याची त्याची क्षमता आहे.

चीनमधील विविध शहरे सध्या ओमायक्रॉनच्या BF.7 या व्हेरियंटमुळे संसर्गाला बळी पडली आहेत. त्यामुळे चीनमध्ये कोविड संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी झेप घेतली आहे. चीनमधील कोरोना विषाणूची प्रकरणे पाहता भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य मंत्रालयाने चीनमधून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी करण्यास सांगितले आहे. आता चीनमधून येणाऱ्या लोकांची चौकशी केली जाईल. मंत्रालयाने यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना अधिकाऱ्यांना जारी केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी भारतातील कोविड परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. बैठक संपल्यानंतर मनसुख मांडविया म्हणाले, "कोविड अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आणि पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत." या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी लोकांना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी तसेच घरामध्येही मास्क घालण्याचा सल्ला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT