JNU  Dainik Gomantak
देश

धक्कादायक! JNU कॅम्पसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (JNU) जंगल परिसरात एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

दैनिक गोमन्तक

JNU News: जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (JNU) जंगल परिसरात एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृत व्यक्तीचे वय 40 ते 45 वर्षे दरम्यान आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, मृत्यूचे खरे कारण काय, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी (Police) असेही सांगितले की, प्राथमिक तपासात त्या व्यक्तीचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाल्याचे दिसते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता पोलिसांना PCR द्वारे जेएनयूच्या (JNU) जंगलात एक मृतदेह लटकल्याची बातमी मिळाली. यावर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता पोलिसांना मृतदेह जंगलात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृताचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असून, बहुतांश मृतदेह कुजलेला आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून आजूबाजूच्या परिसराची चौकशी करत आहे. सध्या तरी मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT