RSS  Dainik Gomantak
देश

जिनांप्रमाणं RSS ही विभाजनवादी; आमदाराची सडकून टीका

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे (AIUDF) आमदार रफीकुल इस्लाम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची (RSS) तुलना मोहम्मद अली जिना यांच्याशी केली आहे.

दैनिक गोमन्तक

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे (AIUDF) आमदार रफीकुल इस्लाम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची (RSS) तुलना मोहम्मद अली जिना यांच्याशी केली आहे. आसामचे आमदार रफीकुल यांनी मंगळवारी सांगितले की, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना आणि आरएसएसमध्ये बरेच साम्य आहे. दोघांनाही देशातील लोकांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पाडायची आहे. ते पुढे म्हणाले, “जिनांनी देशाचे दोन भाग केले- 'भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan).' भाजप आणि आरएसएस देखील तेच करत आहेत. ते हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim), दलित आणि दलितेतर अशी फूट पाडत आहेत. (The Assam MLA compared the RSS to Mohammad Ali Jinnah)

दरम्यान, एआययूडीएफ आमदार म्हणाले की, ''आमचा पक्ष जात, समुदाय आणि धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे समर्थन करत नाही. परंतु भाजप सरकार द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावर भाष्य करताना आसामचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी आग्रह धरत आहे.''

ते पुढे म्हणाले, 'पंतप्रधान मोदी 'द काश्मीर फाइल्स'ला पाठिंबा देत आहेत. त्यांनी काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु करावी. त्याचबरोबर काश्मीरमधील हत्यांचाही तपास करावा, ही जबाबदारी पंतप्रधान आणि भाजप सरकारची आहे. काश्मिरी पंडितांना न्याय मिळायला हवा, पण भाजपचा उद्देश केवळ द्वेष पसरवणे आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT