Saptapadi In Hindu Marriage Act Dainik Gomantak
देश

Hindu Marriage Act: विवाह वैधतेसाठी 'सात फेरे' गरजेचे आहेत का? अलाहाबाद हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Hindu Marriage Act: जोपर्यंत विवाह योग्य समारंभ आणि योग्य पद्धतीने साजरा होत नाही किंवा पार पाडला जात नाही, तोपर्यंत तो 'संपन्न' झाला असे म्हणता येणार नाही.

Ashutosh Masgaunde

The Allahabad High Court, held that a Hindu marriage is not valid without seven rounds or Saptapadi and other rituals: अलाहाबाद हायकोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना सात फेऱ्या आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह वैध नसल्याचे म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची संपूर्ण प्रक्रिया रद्द केली ज्यामध्ये एका पतीने घटस्फोट न घेता आपल्या पत्नीने पुनर्विवाह केल्याचा आरोप केला होता.

'सप्तपदी' समारंभ आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह वैध नाही असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच एका पुरुषाने आपल्या पत्नीने घटस्फोट न घेता दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्याचा आरोप केलेल्या खटल्याची कार्यवाही रद्द केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याचिकाकर्त्यी पत्नी स्मृती सिंह यांचे सत्यम सिंह यांच्यासोबत 2017 मध्ये लग्न झाले होते, परंतु दोघेही एकत्र राहू शकले नाहीत. संबंध बिघडल्यानंतर स्मृती सिंह आपल्या माहेरच्या घरी राहू लागल्या. त्यांनी पती आणि सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

तपासाअंती पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. स्मृती सिंह यांनीही पोटगीसाठी याचिका दाखल केली होती.

11 जानेवारी 2021 रोजी मिर्झापूर कौटुंबिक न्यायालयाने सत्यम सिंह यांना पोटगी म्हणून पत्नीला दरमहा 4,000 रुपये देण्याचे आदेश दिले. स्मृती सिंगने दुसरं लग्न करेपर्यंत हे पैसे तिला देण्याचे आदेश दिले होते.

पतीकडून पत्नीवर पुनर्विवाहाचा आरोप

यानंतर सत्यम सिंह यांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात पत्नीने घटस्फोट न घेता पुनर्विवाह केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.

20 सप्टेंबर 2021 रोजी दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर सुनावणी करताना, कनिष्ठ न्यायालयाने स्मृती सिंग यांना समन्स बजावले आणि त्यांना 21 एप्रिल 2022 रोजी हजर राहण्यास सांगितले. यानंतर स्मृती सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

हिंदू विवाह कायद्याचे कलम ७ काय सांगते?

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, लग्नाच्या संदर्भात 'समारंभ' या शब्दाचा अर्थ 'योग्य समारंभांनी आणि योग्य पद्धतीने विवाह साजरा करणे' असा होतो.

जोपर्यंत विवाह योग्य समारंभ आणि योग्य पद्धतीने साजरा होत नाही किंवा पार पाडला जात नाही, तोपर्यंत तो 'संपन्न' झाला असे म्हणता येणार नाही.

जर विवाह वैध नसेल तर कायद्याच्या दृष्टीने तो विवाह नाही. हिंदू कायद्यानुसार लग्नासाठी सात फेऱ्या लागतात. न्यायालयाने हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 7 वर विसंबून राहिले, ज्यामध्ये अशी तरतूद आहे की हिंदू विवाह कोणत्याही पक्षाच्या परंपरागत संस्कार आणि समारंभांनुसार केला जाऊ शकतो. दुसरे म्हणजे, अशा संस्कारांमध्ये 'सप्तपदी'चा समावेश होतो, जो सात फेऱ्यांनंतरच पूर्ण होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT