Terrorists attack dainik gomantak
देश

दहशतवाद्यांकडून स्थानिक नागरिकाची हत्या

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी कामगारावर झाडल्या गोळ्या

दैनिक गोमन्तक

श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. मार्चमध्ये दहशतवादी हल्ल्यात पंचायत सदस्यांसह अनेक लोक मारले गेले आहेत. त्यातच अशाचप्रकारचा हल्ला पुन्हा करण्यात आला असून यात एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून एका कामगाराला जखमी करण्यात आले आहे. यावेळी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. (Terrorists on Monday shot dead a civilian and injured a non-local vendor)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य काश्मीरच्या (Kashmir) बडगाममधील (Budgam) गोथपोरा भागात संध्याकाळी 7.20 वाजता दहशतवाद्यांनी तजमुल मोहिउद्दीन राथेरच्या घरात घुसून गोळ्या झाडल्या. यावेळी तजमुलला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान दहशतवाद्यांनी (terrorists) पुलवामा जिल्ह्यातील सर्कुलर रोडवर बिहारचा (Bihar) रहिवासी आणि कामगार असलेल्या बिसुजित कुमारवर गोळ्या घातल्या. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला पुलवामा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी, रविवारीच पुलवामामध्ये (Pulwama) एका बिगर स्थानिक मजुरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हल्ल्यानंतर सुतार मोहम्मद अक्रम (वय -40) याला जवळच्या रुग्णालयात आणि नंतर येथील एसएमएचएस रुग्णालयात नेण्यात आले. अकरम हा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी असून तो पुलवामाच्या अरिहालमध्ये बनावटगिरीचे काम करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Banyan Plantation: राज्‍यभरात लावणार वडाची 10 लाख रोपटी, जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर करणार मोफत वितरण- मुख्‍यमंत्री सावंत

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

SCROLL FOR NEXT