Terrorist
Terrorist Dainik Gomantak
देश

Terrorists Conspiracy: गुप्तचर यंत्रणांची मोठी कारवाई, दहशतवादी कटाचा खुलासा

दैनिक गोमन्तक

Jaish-E-Mohammed's Letter: गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने दिवाळीपूर्वी देशाला हादरवणाऱ्या या कटाचा मोठा खुलासा झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशाला हादरवून सोडण्याची धमकी देणारे पत्र सापडले असून, या पत्रातून देशातील अनेक मोठी रेल्वे स्थानके आणि धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, जप्त केलेल्या पत्रात ही ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हे धमकीचे पत्र उत्तराखंडमधील (Uttarakhand) हरिद्वार रेल्वे स्थानकावरुन जप्त करण्यात आले आहे. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून हे पत्र कुठून आणि कसे आले याचा तपास सुरु केला आहे.

या पत्रात ही रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देण्यात आली

खरे तर, 10 ऑक्टोबर रोजी हरिद्वार रेल्वे स्टेशनवर एक पत्र सापडले होते, ज्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी (Terrorist) संघटनेच्या एरिया कमांडरचा उल्लेख होता. 25 ऑक्टोबर रोजी हरिद्वार रेल्वे स्टेशन, डेहराडून रेल्वे स्टेशन, रुरकी, काठगोदाम आणि उत्तराखंडमधील अनेक रेल्वे स्टेशन्स बॉम्बने उडवली जातील, असे त्या पत्रात लिहिले आहे.

काश्मीरमध्ये मारल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांचा बदला

पत्रात असेही लिहिले आहे की, 'हे देवा, मला माफ कर आणि जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या जाणाऱ्या जिहादींच्या मृत्यूचा नक्कीच बदला घेईन. तरच देव मला क्षमा करेल. खुदा हाफिज'- जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammed).

27 ऑक्टोबरला ही मंदिरे बॉम्बने उडवण्याची धमकी

जप्त करण्यात आलेल्या पत्रात 27 ऑक्टोबर रोजी हरिद्वारमध्ये हर की पौरी, भारत माता मंदिर, चंडी देवी, मनसा देवी मंदिर, केदारनाथ मंदिर, बद्रीनाथ मंदिर, यमनोत्री आणि गंगोत्रीलाही बॉम्बने उडवले जाणार असल्याचे लिहिले आहे. या पत्राबाबत आता पोलीस सावध झाले आहेत. हे पत्र कुठून आणि कसे आले? याचीही चौकशी करण्यात येत आहे. यामागे काही उपद्रवी घटक आहेत का, याचाही तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

SCROLL FOR NEXT