Jammu And Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: सुरक्षा जवानांची मोठी कारवाई, चकमकीत दहशतवादी ठार

Srinagar: श्रीनगरच्या नौगाम भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: श्रीनगरच्या नौगाम भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरु आहे.

दरम्यान, श्रीनगरमधील (Srinagar) नौगाम पोलीस स्टेशन परिसरात बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी नौगाम पोलीस स्टेशन क्षेत्रातील डांगरपोरा भागात शोध मोहीम सुरु केली आहे. मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु केला, त्यानंतर चकमक सुरु झाली. कारवाईत आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरांचा प्रयत्न फसला

जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) अखनूर सेक्टरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा जवानांनी पाठलाग केला होता. गेल्या 4 दिवसांत जवानांनी दहशतवाद्यांचा (Terrorists) चौथा प्रयत्न हाणून पाडला. नौशेरा सेक्टरमध्येही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने तो हाणून पाडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT